Special Report: अहो, नाशिकच काय? गल्लीपासून दिल्लीपर्यंत…नावात बरंच काही आहे!

शेक्सपीअरने भले म्हटले असो की, 'नावात काय आहे'? मात्र, नावातच सर्व काही असते. आता हेच पाहा, नाशिक जिल्ह्यातल्या 26 गावांची नावे बदलण्यात आली आहेत.

Special Report: अहो, नाशिकच काय? गल्लीपासून दिल्लीपर्यंत...नावात बरंच काही आहे!
खरंच नावात काय असतं?
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 1:29 PM

मनोज कुलकर्णी, नाशिकः शेक्सपीअरने भले म्हटले असो की, ‘नावात काय आहे’? मात्र, नावातच सर्व काही असते. आता हेच पाहा, नाशिक जिल्ह्यातल्या 26 गावांची नावे बदलण्यात आली आहेत. सामाजिक परिवर्तनाचे चक्र म्हणून त्याकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात गल्लीपासून दिल्लीपर्यंत गावांच्या नावात काय असते ते?

अनेकांची आडनावे, गावांची नावे ही जातिवाचक असतात. त्यांच्या उच्चारावरून बऱ्याचदा जोरदार भांडणांचा कलगीतुरा रंगतो, तर कुठे दंगलीही पेटतात. हेच ध्यानात घेऊन राज्य सरकारने गेल्या डिसेंबर महिन्यात जातिवाचक गावांची आणि वस्त्यांची नावे बदलण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यातील 26 गावांची नावे बदलण्यात आली आहेत. यात चांदवड तालुक्यातील 9, त्र्यंबकमधील 2, निफाड 4, दिंडोरी 4, सटाणा ४, पेठ तालुक्यातील 3 गावांची नावे बदलण्यात आली आहेत. गावाचे नाव बदलण्यासाठी एक प्रक्रिया ठरवण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत नाव बदलण्याचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जातो. जिल्हाधिकारी तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवतात. राज्य सरकारने मंजुरी दिल्यास गावाचे नाव बदलण्यात येते. नाशिक शहरामध्ये एकूण 192 झोपडपट्ट्या आहेत. यातल्या अनेकांची नावे अजूनही जातीनुसार आहेत.

या शहरांचीही नावे बदलली

देशातच काय जगभरात अनेक शहरांची नावे बदलली आहेत. मुंबईचे बॉंबे ऐवजी मुंबई केले. 1996 मध्ये मद्रासचे चेन्नई झाले. 2002 मध्ये कलकत्ताचं कोलकाता झाले आणि नुकतेच अलाहाबादचे प्रयागराज आणि फैझाबादचे अयोध्या झाले. मुगलसराई रेल्वे स्थानकाचे नाव पंडीत दीनदयाल उपाध्याय नगर करण्यात आले. लेनिनच्या मृत्यूनंतर रशियातील सेंट पिट् सबर्ग शहराचे नाव लेनिनग्राड केले. मात्र, ते पुन्हा सेंट पिट्सबर्ग झाले. १७ व्या शतकात फ्रेंच मिशनरींनी दिलेल्या पेकिंग या नावाऐवजी चीनने आपल्या राजधानीला बीजिंग म्हणणे सुरू केले. ओटोमॅन राजाला मुस्तफा केमाल पाशा यांनी पहिल्या महायुद्धात हरवले, तेव्हा कॉन्स्टटिनोपलचे नाव बदलून इस्तंबूल करण्यात आले.

औरंगाबाद, उस्मानाबाद, हैदराबादचीही होते चर्चा

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करा, अशी शिवसेनेची जुनी मागणी आहे. महापालिका निवडणूक रंगात आली की, ती पुन्हा होताना दिसते. त्यासाठी महापालिकेने एक ठराव करूनही पाठवला आहे. असेच आहे मराठवाड्यातल्या उस्मानाबादचे. उस्मानाबादचे नाव धाराशीव करा, अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने होताना दिसते. विशेष म्हणजे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये या दोन्ही शहराची नावे संभाजीनगर आणि धाराशीव अशीच प्रसिद्ध होतात. आता सध्या राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. हे सरकार ही नावे बदलणार का, हे काळच सांगेल. दुसरीकडे हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करा, अशी भाजपची जुनी मागणी आहे.

मुघल प्रशासकांची नावे

भारतावर मुघलांनी दीर्घकाळ राज्य केले. अर्थातच मुघल राजांची अनेक शहरांना, गावांना नावे दिलेली दिसतात. अकबर मुघल राजवटीतला सर्वाधिक प्रसिद्ध राजा. भारतामध्ये अकबराच्या नावाने 252 गावे आणि शहरे आहेत. त्या खालोखाल औरंगजेबच्या नावावर 177, जहांगीरच्या नावावर 141, शहाजहाँनच्या नावावर 63 तर बाबरच्या नावावर 61 शहरांना किंवा गावांना नावे देण्यात आली आहेत. सर्वात कमी म्हणजे हुमायूनच्या नावावर देशात 11 शहरे किंवा गावे आहेत. मुघल शासकांची नावे दिलेली बहुतेक ठिकाणे उत्तर किंवा मध्य भारतात आहेत. उत्तर प्रदेशमधील एक लाखांहून अधिक गावांपैकी 396 गावांना मुघल प्रशासकांचे नाव आहे. उत्तर प्रदेश खालोखाल बिहारमधील 97 महाराष्ट्रातील 50 तर हरयाणामधील 39 शहर अथवा गावांना मुघल प्रशासकांची नावे आहेत.

काही गावांची धमाल नावे

काही गावाची नावेही धमाल असतात. ती ऐकूण अनेकदा आपल्याला हासू फुटते. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या गावांची नावेही अशीच आहेत. नाशिक जिल्ह्यात करंजी, धोडांबे आहे. सोलापूर जिल्ह्यात धोत्री, वांगी. बार्शीमध्ये गुळपोळी, लातुरात कोपरा, वरवंटी नावे आहेत. पुण्यात साखर, विहीर, लोणी, मांजरी गावांची नावे आहेत. अकोल्यात बाळापूर, कानडी आणि अमरावतीत भातुकली नावाचे गाव आहे. भिवंडीमध्ये कोन, गाणे, आमणे, आवळे, कुहे, घाडणे, चाविंद्रे, चाणे, डुंगे, डोहळे, पाये, फिरंगपाडा, भोकरी, वळ, हिवाळी नावेही मजेशीर आहेत. मुरबाडमध्ये आपल्याला दहिगाव, देवघर, पोटगाव, शाई, झाडघर अशी गावे आढळतात. नांडेमध्ये कांडली आणि कनकी, तर करमाळ्यात चक्क उंदरगाव आहे. ही यादी अशीच लांबेल, पण थांबणार नाही.

पुण्यातही आहेत मजेशीर नावे

पुण्यात अनेक मंदिरांची नावे मजेशीर आहेत. शनिवारवाड्यासमोर बटाट्या मारुती, सराफात सोन्या मारुती, केईएम हॉस्पिटसमोर उंटाड्या मारुती, स्मशानाकडे विसावा मारुती आहे. इथेच डुल्या मारुती, भिकादास मारुती तर गुरुवारपेठेत रड्या मारुती आहे. गवत्या मारुती, दंगल्या मारुती, लेंड्या मारुती, भांग्या मारुती, बंदिवान मारुती, तल्लीन मारुती, झेंड्या मारुती, जिलब्या मारुती, गोफण्या मारुतीही पुण्यात भेटतो. सोबतच उपाशी विठोबा, निवडुंग्या विठोबा, पालखी विठोबा, पासोड्या मारुती आणि पासोड्या विठोबा, खणाळ्या म्हसोबा, दगडी नागोबाही मिळतील. काहीही असो. नाव कसेही असो. त्यावरून पराकोटीचे वाद आणि हिंसा टाळलीच पाहिजे. शेवटी नावात सर्व काही विचार केला तर असतेही आणि नसतेही. नाही का? (The names of 26 villages in Nashik district have been changed)

इतर बातम्याः

कृषीमंत्र्यांकडून तातडीने पंचनाम्याचे आदेश; ताडतोब धोरण ठरवणार, सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

तडाखेबंद पावसानं नाशिकमध्ये 14 धरणे फुल्ल; वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार!

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.