AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषीमंत्र्यांकडून तातडीने पंचनाम्याचे आदेश; ताडतोब धोरण ठरवणार, सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, असे आदेश कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, आकडेवारी आल्यानंतर ताबडतोब धोरण ठरवण्यात येणार आहे.

कृषीमंत्र्यांकडून तातडीने पंचनाम्याचे आदेश; ताडतोब धोरण ठरवणार, सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
दादा भुसे, कृषीमंत्री.
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 11:49 AM
Share

नाशिकः पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, असे आदेश कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, आकडेवारी आल्यानंतर ताबडतोब धोरण ठरवण्यात येणार आहे.

गेला चार महिन्यांपासून राज्यात पाऊस, ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाबी चक्रवादळाच्या तडाख्याने त्यात भर पडली आहे. अनेक ठिकाणी इतका पाऊस झाला आहे की, तिथे जाताही येत नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. आकडेवारी गोळा झाल्यानंतर ताबडतोब मदत देण्याचे धोरण ठरवण्यात येणार आहे. जमीन खरवडून गेली असेल तर वेगळे निकष, बागायत आणि फळबागासाठी वेगळे निकष लावण्यात येणार आहेत. ओल्या दुष्काळाबाबत शासन पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पोकळ आश्वासने नको

मराठवाड्यात पूरस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचं आवाहन सरकारला केले आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असे आवाहनच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तीन ट्विट केले आहेत. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

22 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त

दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठवाड्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जवळपास 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचं नुकसान झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यासह एकूण 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

मुख्यमंत्री मराठवाडा दौरा करणार

राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले. राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली. (Agriculture Minister Dada Bhuse orders District Collector to immediately inquire into rain damage)

इतर बातम्याः

6 कोटींची उलाढाल ठप्प; नाशिकमध्ये महापुराच्या भीतीनं सराफा बंद

तडाखेबंद पावसानं नाशिकमध्ये 14 धरणे फुल्ल; वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.