Gold Price : महागाईचे मायाजाल, सोन्याची आभाळाकडे झेप, भाव हजाराने वाढले!

| Updated on: Apr 19, 2022 | 2:39 PM

सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही थांबलेले नाही. श्रीलंकेमध्ये महागाईने आगडोंब उसळला आहे. अनेक देशांची आर्थिक परिस्थिती तोळामासा झालेली दिसतेय. भारतातही महागाई, चलनवाढ डोके वर काढते आहे. ही सारी परिस्थिती पाहता शेअरबाजार कोसळतोय. त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा हुकमी एक्का म्हणून सोन्याकडे वळताना दिसतायत.

Gold Price : महागाईचे मायाजाल, सोन्याची आभाळाकडे झेप, भाव हजाराने वाढले!
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us on

नाशिकः लगीनसराईची वाट बघत सोने खरेदीसाठी थांबलेल्या संबंध महाराष्ट्राच्या नागरिकांना चटुपूट लावणारी बातमी. सोने (Gold) पुन्हा एकदा उसळी घेत असल्याचे दिसत असून, दरात किमान हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगावमध्ये आज मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 54,520 रुपये नोंदवले गेले. नाशिकमध्ये (Nashik) 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 53500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 51000 रुपये नोंदवले गेले. चांदीचे (Silver) दर किलोमागे 72000 रुपये नोंदवले गेल्याची माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. येणाऱ्या काळात सोन्याचे दर चढेच राहतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या जागतिक पातळीवरील विविध कारणांचा परिणाम सोन्याच्या भावावर होतोय. त्यामुळे या किमती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहेत दर?

महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच सोन्याचे दर वाढले आहेत. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 54380 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 49850 रुपये नोंदवले गेले. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 54460 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 49880 रुपये नोंदवले गेले. नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 54460 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 49880 रुपये नोंदवले गेले. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 53500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 51000 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 72000 रुपये नोंदवले गेले. जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 54,520 रुपये नोंदवले गेले.

पुढे काय होणार?

सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही थांबलेले नाही. श्रीलंकेमध्ये महागाईने आगडोंब उसळला आहे. अनेक देशांची आर्थिक परिस्थिती तोळामासा झालेली दिसतेय. भारतातही महागाई, चलनवाढ डोके वर काढते आहे. ही सारी परिस्थिती पाहता शेअरबाजार कोसळतोय. त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा हुकमी एक्का म्हणून सोन्याकडे वळताना दिसतायत. याचा परिणाम सोन्याच्या भाववाढीमध्ये होताना दिसतोय. आगामी काळातही सोन्याचे दर वाढलेले राहतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करतायत.

शहर आणि दर (24 कॅरेट सोने)

– मुंबई – 54380 रुपये

– पुणे – 54460 रुपये

– नागपूर – 54460 रुपये

– नाशिक – 53500 रुपये

– जळगाव – 54,520 रुपये

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 53500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 51000 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 72000 रुपये नोंदवले. येणाऱ्या काळातही सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

– गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!