नाशिकमध्ये धरणे तुडूंब, सात प्रकल्पातून विसर्ग सुरू

| Updated on: Sep 09, 2021 | 4:29 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत झालेल्या दमदार पावसामुळे (NashikRain) सात धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. (Damsfilled) एकूण जिल्ह्यात 68 टक्के, तर गंगापूरमध्ये 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. (Heavy rains in Nashik district, dams filled, water released from seven dams) राज्यभर ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होता. फक्त या दोन दिवसांचा अपवाद वगळता या वर्षी […]

नाशिकमध्ये धरणे तुडूंब, सात प्रकल्पातून विसर्ग सुरू
पावसाने धरणे भरली.
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत झालेल्या दमदार पावसामुळे (NashikRain) सात धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. (Damsfilled) एकूण जिल्ह्यात 68 टक्के, तर गंगापूरमध्ये 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. (Heavy rains in Nashik district, dams filled, water released from seven dams)

राज्यभर ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होता. फक्त या दोन दिवसांचा अपवाद वगळता या वर्षी पावसाने नाशिक जिल्ह्याकडे पाठच फिरवली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसाने ही कसर भरून काढली आहे. सध्या जिल्ह्यातील 24 प्रकल्पांत 68 टक्के, गंगापूर समूहात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात 628 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या नांदगाव व मनमाड तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक 123 मिमी पाऊस एकट्या नांदगाव तालुक्यात नोंदवला असून, जिल्ह्यात आतापर्यंत 76.67 टक्के पाऊस झाला आहे.

चणकापूर धरण 95 टक्के भरले

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चणकापूर धरण 95 टक्के भरले आहे. तर पुनद धरण 92 टक्के भरले. सध्या चणकापूरमधून 800 क्यूसेकने, तर पुनदमधून नदीसाठी 1300 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गिरणा व पुनद नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आला आहे.

कडवा ओव्हरफ्लो

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील कडवा धरण मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांची पाणी चिंता मिटली आहे. सिन्नरसाठीची पाणीपुरवठा योजन या धरणातून आहे. मंगळवारी दुपारी कडवा नदीत 150 क्यूसेक विसर्ग सुरू होता. 1924 दलघफू क्षमतेच्या कडवा धरणावर 88 किमी लांबीचा कालवा असून त्यामुळे इगतपुरी, नाशिक, सिन्नर, निफाड तालुक्यातील एकूण 19404 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

ठेंगोड्यात दमदार

ठेंगोडा परिससरात गेले दोन दिवस दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले. ओढे, नाल्या, विहिरी तुडूंब भरल्या आहेत. ठेंगोडाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. या पावसाने सीताफळ, कोबी, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान होणार आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळपासून रिमझिम

नाशिक शहरात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. सकाळी सातच्या सुमारास पाऊस नव्हता. मात्र, साडेआठ नंतर भुरभुर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सगळीकडे आल्हाददायक वातावरण होते. दुपारपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते. (Heavy rains in Nashik district, dams filled, water released from seven dams)

इतर बातम्याः 

पत्नीने पतीच्या खांद्यावरच सोडला जीव, उपचाराला जाण्यासाठी रस्ताच मिळाला नाही, चार किमीची पायपीट

नाशकात सोने 47200 वर, चांदीच्या गणेश मूर्तीला मागणी