पत्नीने पतीच्या खांद्यावरच सोडला जीव, उपचाराला जाण्यासाठी रस्ताच मिळाला नाही, चार किमीची पायपीट

उपचार न मिळाल्यामुळे (Death without treatment) सलग दुसऱ्या दिवशी रुग्णाने जीव सोडल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना खान्देशात (Khandeh) घडली आहे. चांदसैली (ता. धडगाव) घाटात (Dhadgoan)दरड कोसळल्याने वाहनाला रस्ताच राहिला नाही. त्यामुळे पतीने आपल्या आजारी पत्नीला घेऊन चार किलोमीटरची पायपीट केली. मात्र, त्यांनी रस्त्यातच पतीच्या खांद्यावर जीव सोडला.

पत्नीने पतीच्या खांद्यावरच सोडला जीव, उपचाराला जाण्यासाठी रस्ताच मिळाला नाही, चार किमीची पायपीट
संग्रहित.

नाशिकः उपचार न मिळाल्यामुळे (Death without treatment) सलग दुसऱ्या दिवशी रुग्णाने जीव सोडल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना खान्देशात (Khandeh) घडली आहे. चांदसैली (ता. धडगाव) घाटात (Dhadgoan)दरड कोसळल्याने वाहनाला रस्ताच राहिला नाही. त्यामुळे पतीने आपल्या आजारी पत्नीला घेऊन चार किलोमीटरची पायपीट केली. मात्र, त्यांनी रस्त्यातच पतीच्या खांद्यावर जीव सोडला. सुमदीबाई आदल्या पाडवी असे मृताचे नाव आहे. (The wife left the life on her husband’s shoulder without treatment)

समुदीबाईंना रात्रीपासून उलट्याचा त्रास होत होता. पहाटे त्यांना उपचारासाठी नंदुबारला न्यायचे ठरले. चारचाकीची व्यवस्था करण्यात आली. मात्र, चांदसैली घाटातल्या पहिल्या वळणार पावसामुळे दरड कोसळली. त्यामुळे रस्ता बंद झाला. पुढे जायचे कसे हा प्रश्न होता. तिथे उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनी तळोदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच सुमदीबाईंची प्रकृती खालावली. त्यामुळे पती आदल्या पाडवी यांनी सकाळी साडेसहा वाजता त्यांना खांद्यावर घेऊन प्रवास सुरू केला. नंदुरबारच्या दिशेने चार किलोमीटरचे अंतर त्यांनी पार केले. त्यानंतर पाठीमागून एक दुचाकी आली. त्यांनी या दुचाकीस्वाराला विनंती केली. पत्नीला दुचाकीवरून घेऊन आदल्या पाडवी निघाले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

वीजउपकेंद्राचे काम सुरू
धडगाव येथे वीज उपकेंद्राचे काम सुरू आहे. त्यासाठी ब्लास्टिंग केले जात आहे. त्यामुळे ही दरड कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अजूनही आदिवासी पाड्यापर्यंत रस्ते नाहीत. दळणवळणाची साधने नाहीत. त्यांना मुलभूत सोयी सुविधा कधी मिळणार, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. राज्य सरकार आणि विशेषतः स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांत लक्ष घालून तातडीने पायाभूत सुविधांची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

सलग दुसरी घटना
उपचार न मिळाल्यामुळे सात्री (ता. अमळनेर) येथे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सात्री गावातली आरुषी सुरेश भिल (वय 13) गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. त्यातच मंगळवारी (7 सप्टेंबर) तिची तब्येत आणखी खालावली. त्यामुळे तिला रुग्णालयात नेण्याचे ठरले. मात्र, गावाला पुराचा वेढा. त्यामुळे आरुषीला कसे न्यायचे हा प्रश्न होता. काही निधड्या छातीच्या तरुणांनी पुराच्या पाण्यातून नेऊन प्रयत्नांची शिकस्त करण्याचा निर्धार केला. बाजेला हवा भरलेले ट्यूब बांधले. पट्टीच्या चार पोहणाऱ्यांनी या बाजेवर आरुषीला बसवून तिच्या जीवासाठी पाण्यातून मार्ग काढला. मात्र, या प्रवासातच आरुषीला मोठी उचकी आली. त्यातच तिने जीव सोडला. आता सुमदीबाईंचा मृत्यू ही रस्ता बंद असल्यामुळे उपचाराविना जीव गेल्याची दुसरी घटना आहे. (The wife left the life on her husband’s shoulder without treatment)

इतर बातम्याः

नाशकात सोने 47200 वर, चांदीच्या गणेश मूर्तीला मागणी

मिठाईत भेसळ केल्यास दहा लाखांचा दंड, पाच वर्षांचा कारावास

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI