Raj Thackeray | ‘मी गाडीतून उतरतो, मागे रा रा रा रा रा… अरे काय लावलय’, राज ठाकरेंच थेट भाष्य

| Updated on: Mar 09, 2024 | 1:31 PM

Raj Thackeray | "सोशल मीडियाचा कसा वापर करायचा, याबाबत मी केतन जोशी यांची व्याख्याने राज्यभर ठेवणार आहे. ज्यांना राजकीय महत्त्वकांक्षा आहे, त्यांनीच तिथे यावं" असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

Raj Thackeray | मी गाडीतून उतरतो, मागे रा रा रा रा रा... अरे काय लावलय, राज ठाकरेंच थेट भाष्य
Raj Thackeray
Follow us on

नाशिक : “सोशल मीडिया आपण कसा वापरला पाहिजे. राजकारणासाठी त्याचा कसा वापर केला पाहिजे. लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचलं पाहिजे? जे इतकं महत्त्वाचं माध्यम आहे. तुमच्या हातात हे माध्यम आहे. त्याच्याशी तुम्ही खेळत असता त्याचं कसं राजकीयदृष्ट्या वापरलं पाहिजे? त्याचा उपयोग पक्षाला होऊ शकेल” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे. “माझ्याही बाबतीत काही काही टाकलं जात आहे. गाडी येत आहे, दरवाजा उघडतो. मी खाली उतरतो. मागे रा रा रा रा रा… चालू असतं, अरे काय आहे. म्हणजे काय? यातून हाताला काय लागलं?” अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली.

“काही तरी गाडी दाखवायच्या, माणसं उतरताना दाखवायचे, हे कोणी पाहत नाही. तुम्ही सोशल मीडियावर कंटेट आणि तुमचा कंटेट टाकत असाल, त्यातून काही तरी ऐकायला पाहायला मिळत असेल तर लोकं पाहतात. नाही तर पाहत नाहीत” असं राज ठाकरे म्हणाले. “सोशल मीडियाचा कसा वापर करायचा, याबाबत मी केतन जोशी यांची व्याख्याने राज्यभर ठेवणार आहे. ज्यांना राजकीय महत्त्वकांक्षा आहे, त्यांनीच तिथे यावं” असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

‘आम्ही बटाटा टाकणार तो तळून आला पाहिजे’

“महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात दरवर्षी आपण वर्धापन दिन साजरा करू. आज पक्षाला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. तुम्हाला राजकीय इतिहास सांगणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वडा टाकला की तळून आला पाहिजे. पण बटाटा शिजवावा लागतो, त्यात काही गोष्टी टाकायच्या असतात मग तळावा लागतो. ही सर्व प्रोसेस बाजूला. फक्त आम्ही बटाटा टाकणार तो तळून आला पाहिजे. सर्व गोष्टी फास्टफूड लेव्हलला गेल्या आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेल. राजकारणात वावरायचं असेल राहायचं असेल टिकायचं असेल तर सर्वात मोठी गोष्ट लागते पेशन्स” असं राज ठाकरे म्हणाले.