Pune Dargah Tension | ‘….तर हिंदू काय आहेत दाखवून देऊ’, पुण्यात दर्ग्यावरुन तणाव, मनसेचा इशारा

Pune Dargah Tension | पुण्यात काल रात्री कसबा पेठेतील शेख सलाउद्दीन दर्गा पाडणार असा मेसेज फिरत होता. त्यावरुन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज दर्गा परिसरात जमला होता. आता मनसेने एक आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

Pune Dargah Tension | '....तर हिंदू काय आहेत दाखवून देऊ', पुण्यात दर्ग्यावरुन तणाव, मनसेचा इशारा
Pune news
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 12:15 PM

Pune Dargah Tension (प्रदीप कापसे/चंदन पूजाधिकारी) |  पुणे शहरात कसबा पेठेतील शेख सलाउद्दीन दर्गा परिसरात कालरात्री मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. दर्ग्यावर कारवाई होणार, दर्गा पाडणारअशी अफवा पसरल्याने ही गर्दी जमली होती. काही हजारांचा जमाव परिसरात जमला होता. अखेर पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर तणाव निवळला. परिसरात शांतता निर्माण झाली. काही लोक अफवा पसरवून भडकवण्याच काम करतायत. असे लोक आमच्या रडारवर आहेत असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. आज पोलीस आयुक्तालयात या संदर्भात एक बैठक झाली. या वादासंदर्भात सोशल मीडियावर काही स्टेटस ठेवले जात आहेत, असा प्रश्न पोलीस आयुक्तांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, आवश्यकतेनुसार कारवाई करु.

दरम्यान आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. काल घडलेल्या घटनेवर अमितेश कुमार माहिती घेणार आहेत. ही अफवा कोणी पसरवली याची माहिती घेणार. एवढा जमाव त्या ठिकाणी कसा जमला? याची माहिती घेणार. पोलीस आयुक्तांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. कोणत्या ही अफवांवर विश्वास ठेवू नका असं ते म्हणाले.

‘राज साहेबांनी याठिकाणी भेट दिली आहे’

पुण्यात दर्गा पाडणार म्हणून काल जो जमाव जमला होता, त्यावर मनसे पुणे सरचिटणीस अजय शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पुणेशवरमध्ये काल मुद्दाम जमाव जमवला गेला. दर्गा पाडणार, एकत्र या अशा आशयाचे मेसेज अनेक दिवसांपासून फिरत आहेत. आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली आहे. मात्र, आम्हाला ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तर हिंदू काय आहेत दाखवून देऊ. राज साहेबांनी याठिकाणी भेट दिली आहे. ते पुढची भूमिका काय घेतात त्याप्रमाणे बघू” असं अजय शिंदे म्हणाले.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

पुण्यातील तणावामुळे पुणे पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.