Photo Gallery | अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मंत्री छगन भुजबळ

| Updated on: Mar 31, 2022 | 2:34 PM

नाशिक - पुणे महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या घटनेतील जखमींना मंत्री छगन भुजबळ यांनी धावून मदत केली.

1 / 5
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील कार्यक्रमातून परतत असताना नाशिक - पुणे महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीमध्ये अपघात झाला.

2 / 5
मंत्री छगन भुजबळ यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवित तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी आपले कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या ताफ्यातील गाडी अपघातग्रस्ताला उपलब्ध करून देत तातडीने सिन्नर येथील रुग्णालयात पाठविले.

3 / 5
मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या स्वीय सहायकाना सूचना करत सिन्नर येथील डॉक्टरांना माहिती देऊन योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांचा ताफा नाशिककडे मार्गस्थ झाला.

4 / 5
भुजबळांनी यावेळी जखमी झालेल्या जोडप्याची चौकशी केली. त्यांना धीर दिला. एका व्यक्तीच्या डोक्यातून बरेच रक्त वाहत होते. त्यांनी जखम झालेल्या ठिकाणी रुमाल लावून धरला होता. भुजबळ जवळ येताच जखमी व्यक्तीलाही अवघडल्यासारखे झाले.

5 / 5
अपघातातील जखमींना भुजबळांनी मदत केली. त्यांना हवे-नको ते विचारले. काही दिवसांपूर्वी भुजबळ वणी येथे गेले असता असाच प्रकार घडला होता. तेव्हाही भुजबळांनी मदत कार्यात पुढाकार घेतला होता. स्वतः वाहतूक सुरळीत केली होती.