Nashik: श्वानाच्या अंत्यविधीसाठी उसळला जनसागर, गावात त्याचे स्मारकही बांधणार

पळसे गावात कोणाचाही अंत्यविधी असो, रक्षा विसर्जन, दशक्रिया विधी असो तो गावातील भावकीतला असल्याप्रमाणे प्रत्येक विधीकरिता माणसांसोबत चालत दारणातीरी हजर असायचा. त्याची उपस्थिती ही कायमच चर्चेचा विषय असायचा.  बाराशे नामक श्‍वानाचा शुक्रवारी  अंत्यविधी झाला.

Nashik: श्वानाच्या अंत्यविधीसाठी उसळला जनसागर, गावात त्याचे स्मारकही बांधणार
श्वानाचे अंत्यसंस्कार
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 06, 2022 | 3:12 PM

नाशिक, भूतदयेची शिकवण सगळ्याच धर्मात दिलेली आहे. याशिवाय प्राण्यांवर विशेष म्हणजे श्वानांवर (Dog) प्रेम करणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात. जितका माणूस प्रणयाला जीव लावतो तितकाच श्वानही माणसाला जीव लावत असतो. मात्र नाशिक जिल्ह्यात एक दुर्मिळ घटना घडल्याचे समोर आले आहे. एका श्वानाच्या अंत्यसंस्कारासाठी (Funeral) चक्क गाव गोळा झाले होते. पळसे गावात नुकत्याच ‘बाराशे’ (Barashe) नामक शश्‍वानाच्या निधनाने हळहळ व्यक्‍त केली जात आहे. या श्‍वानाच्या अंत्यविधीला पळसे गावात मोठा जनसागर लोटला होता. या ठिकाणी शोकसभा झाली आणि शोकसभेमध्ये या श्‍वानाच्या स्मारक बांधण्याबाबत ग्रामस्थांनी एकमताने ठरावही मंजूर केला.

पळसे गावात कोणाचाही अंत्यविधी असो, रक्षा विसर्जन, दशक्रिया विधी असो तो गावातील भावकीतला असल्याप्रमाणे प्रत्येक विधीकरिता माणसांसोबत चालत दारणातीरी हजर असायचा. त्याची उपस्थिती ही कायमच चर्चेचा विषय असायचा.  बाराशे नामक श्‍वानाचा शुक्रवारी  अंत्यविधी झाला. या वेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केळी होती. गावातील हरिनाम सप्ताहातील कार्यक्रमास, इतर सुख दुःखाच्या प्रसंगी कोणाच्याही दारी तो हक्काने दिसत असे. त्याला कोणाच्याही घरी मुक्‍त प्रवेश असे. तरुण पिढी त्याला आवर्जून बिस्किटे देत, तर एखादी आजी त्याला आठवणीने चतकोर भाकरी काढून ठेवायची. शुक्रवारी पहाटे त्याचे निधन झाल्याने समस्त पळसेकरांनी हळहळ व्यक्‍त केली. गावाच्या वेशीपासून त्याची मिरवणूक काढून रीतीरिवाजाप्रमाणे त्याचा अंत्यविधी केला.

साहित्यिक उत्तम कांबळे, तसेच पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर अशा अनेक ठिकाणांहून नागरिक खास या माणूसवेड्या बाराशे नामक श्‍वानाला बघायला येऊन गेलेले आहेत. ‘बाराशे’चे पुढील पिढीकरिता गावात उचित स्मारक करण्याचा निर्णय शोकसभेत विष्णुपंत गायखे यांनी ग्रामस्थांच्या सूचनेनुसार घेतला. याप्रसंगी उपसरपंचासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.