Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा नसल्याने मुलींकडूनच पार्थिवाला खांदा, 5 मुलींकडून आईला अखेरचा निरोप

अंत्यसंस्कारावेळी पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या आईला पाच लेकींनी साश्रू नयनांनी खांदा दिला. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग शेकडो गावकऱ्यांनी अनुभवला.

मुलगा नसल्याने मुलींकडूनच पार्थिवाला खांदा, 5 मुलींकडून आईला अखेरचा निरोप
पाच लेकींनी आईवर अंतिम संस्कार केले...
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 12:54 PM

गडचिरोली : अंत्यसंस्कारावेळी पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या आईला पाच लेकींनी साश्रू नयनांनी खांदा दिला. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग शेकडो गावकऱ्यांनी अनुभवला. मुलगा नसल्यामुळे पाच मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन अंतिम संस्कार केले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या पाच लेकींनी भासू दिली नाही.

5 मुलींकडून आईला अखेरचा निरोप

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील रहिवासी अण्णाजी रामचंद्र पाकलवार यांच्या पत्नी निर्मला पाकलवार यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पाकलवार यांना 5 मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.

आई वडिलांच्या पार्थिवावर मुलांनी अंतिम संस्कार करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. आई वडिलांच्या निधनानंतर मुलांच्या हातांनी अंतिम संस्कार पार पाडण्याची प्रथा आहे. परंतु पाकलवार यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या मुलींनीच अंतिम संस्कार पार पाडले.

शिक्षणाचा वसा देणारे रामचंद्र गुरुजी

कोरचीचे अण्णाजी रामचंद्र पाकलवार हे माजी मुख्याध्यापक असून त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा पडगा आहे. मुलगा नसल्याची खंत त्यांना आयुष्यभर कधीही वाटली नाही. पत्नी गेल्यानंतरही आपल्या मुलींनी अंत्यसंस्कार करावे, या मताचे ते होते. त्यानुसार पाकलवारांच्या 5 मुलींनी आपल्या लाडक्या आईला साश्रू नयनांनी निरोप दिला.

पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा

पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत या बारा लाडक्या मुलींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्याचं दिसून आलं.

बीडमध्ये चार सुनांचा सासूला खांदा

बीड शहरातील काशिनाथ नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या सुंदरबाई नाईकवाडे यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पश्चात चार मुलं आणि दोन मुली आहेत. मात्र सासरी असताना कधीच माहेरची आठवण येऊ न दिल्याने या सुनांनी आपल्या लाडक्या सासूला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला होता.

(Five Daughters perform last rites of mother in maharashtra Gadchiroli)

हे ही वाचा :

आईसारखं सांभाळलेल्या सासूचं निधन, चार सुनांनी स्वतः खांदा दिला

बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.