श्री क्षेत्र त्रंबकेश्वर देवस्थानमधील वाद चव्हाट्यावर, अध्यक्ष विरूध्द विश्वस्त वाद रंगणार!

| Updated on: Jun 08, 2022 | 2:10 PM

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर देवस्थानला भेट देण्यासाठी देशातून दररोज हजारो भाविक येतात. त्रंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विकास कुलकर्णी हे मंदिरामध्ये हुकूमशाही आणि मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्रंबकेश्वर देवस्थानच्या भाविक विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, टेंडर वर्क, ऑर्डर करताना अध्यक्ष मनमानी कारभार करत आहे.

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर देवस्थानमधील वाद चव्हाट्यावर, अध्यक्ष विरूध्द विश्वस्त वाद रंगणार!
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले श्री क्षेत्र त्रंबकेश्वर देवस्थानमध्ये सध्या मोठा वाद (Argument) निर्माण झाला आहे. देवस्थानाचे अध्यक्ष विरूध्द विश्वस्त असा संघर्ष राज्याला बघायला मिळतो आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदाच कदाचित असा संघर्ष (Conflict) सुरू असेल. विश्वस्तांचा असा आरोप आहे की, अध्यक्ष हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहेत. मात्र, यासंदर्भात अध्यक्षांना बोलण्यास नकार दिलाय. यामुळे विश्वस्तांनी केलेल्या आरोपांकडे अधिकच गार्भियाने बघितले जात आहे. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र त्रंबकेश्वर (Shri Kshetra Trumbakeshwar) देवस्थानमध्ये अध्यक्ष विरुद्ध विश्वस्त असा नवा वाद उभा राहिल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

अध्यक्ष विरूध्द विश्वस्त सामना रंगणार

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर देवस्थानला भेट देण्यासाठी देशातून दररोज हजारो भाविक येतात. त्रंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विकास कुलकर्णी हे मंदिरामध्ये हुकूमशाही आणि मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्रंबकेश्वर देवस्थानच्या भाविक विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, टेंडर वर्क, ऑर्डर करताना अध्यक्ष मनमानी कारभार करत आहे, मात्र त्यांच्या या कारभारावर आवाज उठवला तर ते न्यायाधिश असल्याचा फायदा घेत आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. असा गंभीर आरोप विश्र्वस्थानी केला आहे.

हे सुद्धा वाचा

अध्यक्षांनी बोलण्यास दिला नकार

या विषयी सर्व विश्वस्तांनी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या सगळ्या प्रकरणावर मंदिराचे अध्यक्ष विकास कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देत हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने आपण योग्य ठिकाणी भूमिका मांडू असे म्हटले आहे. त्यामुळे या आरोपाची दुसरी बाजू कुलकर्णी यांच्या खुलाश्यानंतरच समोर येणार आहे. मात्र अस असल तरी या आरोपांमुळे त्रंबकेश्वर देवस्थान मधील अंतर्गत वाद मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची धर्मदाय विभाग काय भूमिका घेणार हे बघण महत्वाचं ठरणार आहे.