Nashik | पहिल्याच पावसात नाशिकमधील रस्ते “खड्ड्यात”, महापालिकेचे पितळ उघडे!

| Updated on: Jul 18, 2022 | 8:37 AM

शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून आपण रस्त्यावरून प्रवास करतोय की खड्ड्यातून हाच प्रश्न नाशिककरांना पडलायं. पहिल्याच पावसात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला वेळ कधी मिळणार असा प्रश्न आता नागरिक विचारताना दिसत आहेत. खड्ड्यांवर पाणी साचत असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Nashik | पहिल्याच पावसात नाशिकमधील रस्ते खड्ड्यात, महापालिकेचे पितळ उघडे!
Image Credit source: tv9
Follow us on

नाशिक : नाशिक (Nashik) शहरात पाऊस आणि खड्डे हे समीकरण खूप जुनेच आहे. खड्ड्यांमुळे नाशिककरांना मोठा त्रास सहन करावा लागतोयं. पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्याने खड्डे दिसत नाहीत आणि वाहनचालक (Driver) थेट खड्ड्यामध्ये गाडी घालतात. बऱ्याच वेळा तर खड्ड्यामध्ये गेलेली गाडी काढण्यासाठी वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्याच्या अगोदर महापालिकेकडून (Nashik Municipal Corporation) शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा दावा केला जातो. मात्र, पहिल्याच पावसामध्ये महापालिकेचे पितळ उघडे पडण्यास सुरूवात होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत.

शहरातील रस्त्यांची झाली चाळण

शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून आपण रस्त्यावरून प्रवास करतोय की खड्ड्यातून हाच प्रश्न नाशिककरांना पडलायं. पहिल्याच पावसात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला वेळ कधी मिळणार असा प्रश्न आता नागरिक विचारताना दिसत आहेत. खड्ड्यांवर पाणी साचत असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. इतकेच नाही तर खड्ड्यांमुळे शहरात अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

हे सुद्धा वाचा

खड्ड्यामुंळे अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ

जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सहा धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. नाशिक जिल्हाचे पाणीटंचाईचे संकट टळले आहे. आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी 15 जुलै पर्यंत जेमतेम 28 टक्के असलेला धरणसाठा यंदा 79 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणांमधून केलेल्या पाण्याच्या विसर्गने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आल्याचे दिसून येते.