राज्यात आणखी एका विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाची मागणी

| Updated on: Jul 01, 2021 | 4:21 PM

नवी मुंबई विमातळाच्या नामकरणाचा प्रश्न ऐरणीवर असताना आता नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा समोर आला आहे.

राज्यात आणखी एका विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाची मागणी
आरपीआय मनमाड
Follow us on

रईस शेख, टीव्ही 9 मराठी, मालेगाव, नाशिक: राज्यात नवी मुंबईतील विमानतळाला नाव देण्यावरून वाद सुरू असतानाच आणखी एका ठिकाणी विमानतळ नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळाला कर्मवीरदादा साहेब गायकवाड यांचे नाव देण्यासाठी आरपीआयने आक्रमक भूमिका घेतली आहे. आरपीआयच्या वतीनं मनमाडला नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे,नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन,गुरुकुमार निकाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. (Nashik Manmad RPI demanded Karmaveer Dadasaheb Gaikwad name will given to Ojhar Air Port)

मनमाड शहरात तीव्र निदर्शनं

आरपीआयच्यावतीनं ओझर येथील विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. मनमाड शहरातील विविध मार्गावरून जाऊन हा मोर्चा एकात्मता चौकात आल्यावर येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरपीआयनं त्यांच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने केली. शासनाने तातडीने ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ओझर विमानतळाला कर्मवारी दादासाहेब गायकवाड यांचं नाव देण्यासाठी आगामी काळात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने केली जाईल, असा इशारा नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी दिला.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड कोण होते?

कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी होते. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव भाऊराव कृष्णराव गायकवाड असे आहे. मुंबईतून ते विधानसभा, लोकसभेवर निवडून गेले होते. तर, काही काळ त्यांनी राज्यसभेवर देखली प्रतिनिधत्व केलं होतं. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावानं भारतीय पोस्ट विभागानं डाक टिकीट जारी केले आहे.

नवी मुंबईत दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आंदोलन

नवी मुंबई येथील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं, असा ठराव राज्य सरकारनं केला आहे. राज्य सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही आहे. तर नवी मुंबई येथील स्थानिक लोक दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला द्यावे, म्हणून आक्रमक झाले आहेत. 24 जूनला स्थानिकांनी दि. बा. पाटील यांचं नाव द्यावं, म्हणून सिडकोला घेराव आंदोनल देखील केलं होतं. नवी मुंबईच्या विकासातील योगदान लक्षात घेता माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

नवी मुंबईच्या विमानतळाचा नामकरणाचा वाद कायम असताना आता ओझर विमानतळाचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. आरपीआयनं कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाची मागणी केलीय. राज्य सरकार याबाबत कोणता निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या

निवडणुकांबाबत राज्यपाल मुख्यमंत्र्यांना सूचना करू शकतात का?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात!

तिचा UPSC चा निकाल लागला, पेपरात फोटो आला पण पावसात बॉयफ्रेंडसोबत फिरतानाचा, पुढं त्या मुलीचं-मुलाचं नेमकं काय झालं?

(Nashik Manmad RPI demanded Karmaveer Dadasaheb Gaikwad name will given to Ojhar Air Port)