नाशिकमध्ये ठाकरे गटालाच नव्हे, मनसेलाही खिंडार, अमित ठाकरे नाशकात असतानाच पक्षात फूट; नगरसेवकांसह पदाधिकारी शिंदे गटात

अमित ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यातच मनसेचा एक माजी नगरसेवक आणि दोन पदाधिकारी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात सामील झाले आहेत.

नाशिकमध्ये ठाकरे गटालाच नव्हे, मनसेलाही खिंडार, अमित ठाकरे नाशकात असतानाच पक्षात फूट; नगरसेवकांसह पदाधिकारी शिंदे गटात
नाशिकमध्ये ठाकरे गटालाच नव्हे, मनसेलाही खिंडार, अमित ठाकरे नाशकात असतानाच पक्षात फूट
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 28, 2022 | 8:50 AM

नाशिक: राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आल्यापासून शिंदे गट राजकीयदृष्ट्या वरचढ होताना दिसत आहे. राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. त्यातही ठाकरे गटातून फुटून येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर राष्ट्रवादीतूनही अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, आता यात मनसेचाही नंबर लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं चांगलच सूत जमत असतानाही मनसेला खिंडार पडलं आहे. मनसेच्या माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेत एकच खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटा पाठोपाठ मनसेचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे मनसे नेते अमित ठाकरेंचा नाशिक दौऱ्या सुरू असतानाच मनसेत पडझड झाली आहे. पक्षाचा बडा नेता जिल्ह्यात असतानाही कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याने मनसेच्या तंबूत मोठी खळबळ उडाली आहे.

अमित ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यातच मनसेचा एक माजी नगरसेवक आणि दोन पदाधिकारी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात सामील झाले आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून पदाधिकारी जात असल्याने मनसेला मोठाच हादरा बसला आहे. त्यामुळे अमित ठाकरे आता नाशिकच्या संघटन बांधणीबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, एकीकडे अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून दुसरीकडे राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांचा पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. राज ठाकरे आज सहजीवन व्याख्यानमालेत सहभागी होणार आहे. ‘नवं काहीतरी’ या विषयावर राज ठाकरे व्याख्यान देणार आहेत.

या व्याख्यानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज संध्याकाळी 6:30 वाजता होणाऱ्या या व्याख्यानाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.