पाणीपट्टीसह घरपट्टी थकबाकीदार नाशिक महापालिकेच्या रडारवर, 400 कोटींच्या वसुलीचं आव्हान

| Updated on: Jul 14, 2021 | 10:26 AM

घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीदारांना नाशिक महापालिकेने जप्तीच्या नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे. सुमारे 10 हजार मिळकतदारांना मनपाची नोटीस गेल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

पाणीपट्टीसह घरपट्टी थकबाकीदार नाशिक महापालिकेच्या रडारवर, 400 कोटींच्या वसुलीचं आव्हान
Nashik Municipal corporation
Follow us on

नाशिक: घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीदारांना नाशिक महापालिकेने जप्तीच्या नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे. सुमारे 10 हजार मिळकतदारांना मनपाची नोटीस गेल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 25 हजार ते 1 लाखांपर्यंत थकबाकी असलेल्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे..पाणीपट्टी पाठोपाठ घरपट्टी थकबाकीदार मनपाच्या रडारवर असल्याचं यामुळे बघायला मिळत आहे.

एकूण 400 कोटींची थकबाकी

मनपाच्या अंदाजपत्रकात यंदा 300 कोटींची तूट असल्याने मनपा कडून नोटीस बजावून तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे..मनपाची पाणीपट्टी थकबाकी 100 कोटींच्या, तर घरपट्टी 300 कोटींच्या घरात असल्याने मनपा प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे

नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा

नाशिक महापालिकेनं शहरातील तब्बल 7 हजार नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. कोरोना काळात घरपट्टी,पाणीपट्टी थकवल्याने मनपाच्या तिजोरीत मोठी घट आली आहे. आतापर्यंत महापालिकेची थकबाकी 400 कोटींपर्यंत गेली आहे. नाशिक महापालिकेचे पाणीपट्टीचे एकूण 20 हजार पेक्षा अधिक थकबाकीदार आहेत. त्यापैकी शहरात 7 हजार थकबाकीदार आहेत. थकबाकीदारांना 7 दिवसात थकीत पाणीपट्टी भरण्याचा दिला अल्टीमेटम,अन्यथा नळ कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या वतीनं देण्यात आला होता.

पहिल्या तिमाहीत 150 कोटींचा फटका

मार्च 2020 पासून सुरु झालेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळं आणि लॉकडाऊनमुळं देशातील अनेक घटकांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. कोरोना काळात अनेक नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी थकवल्यानं नाशिक महापालिकेच्या तिजोरीत मोठी घट आली आहे. नाशिक महापालिकेला पहिल्या तिमाहीत तब्बल 150 कोटी रुपयांची घट आलेली आहे. वर्षाकाठी नाशिक महापालिकेला 350 कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे. यामुळे धास्तावलेल्या नाशिक महापालिकेनं शहरातील तब्बल 7 हजार नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे.


इतर बातम्या:

नाशिकवरील पाणी कपातीचं संकट गडद, जलसंपदा विभागाचं पालिकेला पत्र, अधिक पाणी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

कोरोना लसींचा तुटवडा, नाशिककरांची निराशा, 2 केंद्रांवर कोवॅक्सिनचं लसीकरण, कोविशील्डचा साठा संपला

(Nashik Municipal Corporation send notice to ten thousand citizens who not paid water bill and home tax)