“कांद्याला किती खोके भाव मिळाला” : उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाऊन खोचक टीका…

| Updated on: Mar 26, 2023 | 8:35 PM

आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा खोक्यांचा उल्लेख केल्याने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हे खोक्यांच्या राजकारण तापणार  असल्याचे दिसून येत आहे.

कांद्याला किती खोके भाव मिळाला : उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाऊन खोचक टीका...
Follow us on

मालेगाव/नाशिक : ज्या शिवसेनेने तुम्हाला जन्म दिला. त्या शिवसेनेच्या आईच्या कुशीवर वार करणारे हे चोर असल्याची टीका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार घणाघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी कोकणातील रत्नागिरीच्या खेडमधील सभेनंतर आज उत्तर महाराष्ट्रातील मालेगावमध्ये सभा घेताना त्यांनी सत्ताधारी गटावर जोरदार हल्लाबोल केला.

मालेगावमधील सभेत आज खासदार संजय राऊत, सुभाष देसाई यांची तोफ धडाडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आईवर वार करणारे हे गद्दार आहेत म्हणत त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे यांच्या सभेत खासदार संजय राऊत यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. या कांद्याला रस्त्यावर फेकायचे आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

खासदार संजय राऊत यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर टीकी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्यावर टीका करताना त्यांनी कांद्याला किती भाव मिळाला असं म्हणत कांद्याला किती खोके मिळाले असा टोला त्यांनी सुहास कांदे यांना लगावला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.

मालेगावमध्ये सभा असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनेलाही हात घातला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज होते त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला की नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी सत्ता आल्यानंतर शेतकरी राजाला कर्जमुक्ती करायचं आहे तेच आमचं पहिलं पाऊल होतं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा खोक्यांचा उल्लेख केल्याने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हे खोक्यांच्या राजकारण तापणार  असल्याचे दिसून येत आहे.