नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेला नाशिकमध्ये अल्प प्रतिसाद, नागरिकांसह पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली

| Updated on: Aug 16, 2021 | 10:53 PM

देशाचा 75 वा स्वांतत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक शहर आणि परिसरात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहिम सुरु करण्यात आली होती.

नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेला नाशिकमध्ये अल्प प्रतिसाद, नागरिकांसह पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली
Follow us on

नाशिक : देशाचा 75 वा स्वांतत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक शहर आणि परिसरात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहिम सुरु करण्यात आली होती. मात्र या मोहिमेला नागरिकांनी हरताळ फासला आहे. अनेक ठिकाणी या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. (Nashik people as well as petrol pump staff no response to No Helmet No Petrol campaign in city)

नागरिकांकडून मोहिमेला हरताळ

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांच्या संकल्पनेतून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहिम सुरु करण्यात आली होती. सोमवारी (15 ऑगस्ट) नाशिक शहर आणि परिसरात ही मोहिम राबवण्यास सुरुवात झाली. मात्र मोहिमेला आज काही ठिकाणी नागरिकांनी हरताळ फासल्याचं पाहायला मिळालं.

पेट्रोल पंपावर नागरिक विनाहेल्मेट

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते काल या मोहिमेचे उद्घाटन पार पडले. पण सलग पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नो हेल्मेट, नो पेट्रोल या मोहिमेकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नागरिक हे विनाहेल्मेट येऊन पेट्रोल भरताना दिसत आहेत.

पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली

विशेष म्हणजे पेट्रोल पंप कर्मचारी देखील विना हेल्मेट दुचाकी चालकांना पेट्रोल देताना पाहायला मिळाले. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या “नो हेल्मेट, नो पेट्रोल ” या मोहिमेला नागरिकांबरोबरच काही पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडूनदेखील केराची टोपली दाखवण्यात येत आहे.

इतर बातम्या

नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करु; ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री भुजबळांची ग्वाही

भुजबळ म्हणतात, सर सलामत तो हेल्मेट पचास; नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू

(Nashik people as well as petrol pump staff no response to No Helmet No Petrol campaign in city)