Nashik School : नाशिकमध्ये नामांकित शाळेने विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला; पालक थेट ग्राहक मंचात, प्रकरण काय?

| Updated on: Apr 27, 2022 | 10:40 AM

नाशिकमध्ये (Nashik) एका नामांकित शाळेने (School) एका विद्यार्थ्याला प्रवेश (Admission) नाकारल्याचा प्रकार घडला आहे. विद्यार्थी स्पेशल चाइल्ड आहे. तो वर्गात शांत बसत नाही, असे कारण शाळेने पुढे केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याविरोधात पालकांनी थेट ग्राहक मंच न्यायालयात धाव घेतली आहे.

Nashik School : नाशिकमध्ये नामांकित शाळेने विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला; पालक थेट ग्राहक मंचात, प्रकरण काय?
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) एका नामांकित शाळेने (School) एका विद्यार्थ्याला प्रवेश (Admission) नाकारल्याचा प्रकार घडला आहे. विद्यार्थी स्पेशल चाइल्ड आहे. तो वर्गात शांत बसत नाही, असे कारण शाळेने पुढे केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याविरोधात पालकांनी थेट ग्राहक मंच न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, नाशिक देवळाली परिसरात बार्न्स नावाची सुप्रसिद्ध शाळा आहे. या शाळेत एका दाम्पत्याने आपल्या मुलाचा प्रवेश घेतला. मात्र, नंतर शाळेने हा प्रवेश नाकारला. या प्रकरणी पालकांनी थेट ग्राहक मंच न्यायालयात धाव घेतली. त्यांनी या विद्यार्थ्याला 17 मे पर्यंत शाळेतून काढू नका, असा आदेश दिला आहे. दरम्यान, शाळा प्रशासनाची याबाबत टीव्ही 9 मराठीने संपर्क साधला तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, पालकांनी केलेले सारे आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना वन टू वन शिक्षण देणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.

प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

शाळेने प्रवेश नाकारल्याप्रकरणी आता प्रशासन आणि शिक्षणाधिकारी काही निर्णय घेतात का, याकडे लक्ष लागले आहे. खरे तर पालक संबंधित शाळेची फी भरण्यास तयार असतील आणि त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली असेल, तर असे अचानक विद्यार्थ्याला काढून टाकणे अन्यायकारक म्हणावे लागेल. यावर ग्राहक मंच काय निर्णय घेणार, याचीही उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे यावर्षी ऐन प्रवेश प्रक्रियेदरम्यान हे गंभीर प्रकरण समोर आल्याने, यावर नेमके काय होणार पाहावे लागेल.

मात्र, तो आक्षेप गंभीर

शाळेने आपल्या मुलाला स्पेशल चाइल्ड असल्याचे म्हटले आहे, असा आरोप पालकांनी केला आहे. खरे तर मुलगा चंचल असेल किंवा खोड्या करत असेल, तर त्याला स्पेशल चाइल्ड किंवा विशेष मूल म्हणणे योग्य नाही. विशेष मूल वेगळे असते. यावरही शाळेने आपली काही प्रतिक्रिया दिली नाही. आता या प्रकरणीही प्रशासन आणि ग्राहक मंच काय म्हणणार, काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.