नाशिकमध्ये वाढीव शाळा फीचा वाद पेटला, पालकांची आक्रमक भूमिका, पोलिसांची मध्यस्थी

| Updated on: Jun 26, 2021 | 11:52 AM

शालेय फीचा प्रश्न गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. शाळांच्या फीचा प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. कोरोना संकटातही शाळांनी वाढवलेल्या फी च्या मुद्यावरुन पालक आणि शाळांमध्ये गोंधळ सुरूच आहे.

नाशिकमध्ये वाढीव शाळा फीचा वाद पेटला, पालकांची आक्रमक भूमिका, पोलिसांची मध्यस्थी
नाशिकमध्ये शाळा फीचा वाद पेटला
Follow us on

नाशिक: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मार्च 2020 पासून शाळा बंद आहेत. शालेय फीचा प्रश्न गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. शाळांच्या फीचा प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. कोरोना संकटातही शाळांनी वाढवलेल्या फीच्या मुद्यावरुन पालक आणि शाळांमध्ये गोंधळ सुरूच आहे. नाशिक येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल मध्ये देखील पालक फी कमी करण्याच्या मागणीवर आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Nashik School Fee Issue Parents angry at sacred heart convent school)

पालकांची मागणी काय?

नाशिक येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल मध्ये देखील पालकांनी फी कमी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल सर्वच पालक शाळेबाहेर जमल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. शाळेने फी मध्ये 50 टक्के सवलत देण्याची मागणी पालकांच्या वतीनं करण्यात आली आहे. पालकांच्या गोंधळानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये आज बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे.

तर खासगी शाळांवर कारवाई करणार

महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं यापूर्वीही खासगी शाळेच्या फी वसूलीबाबत जीआर काढला होते. मुलांना राईट टू एज्युकेशनचा हक्क आहे. विद्यार्थ्यांना त्यामळे शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. भविष्यात एखाद्या शाळेची तक्रार आली तर निश्चित कारवाई होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा बंद राहण्याचे संकेत

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता सरकारकडून योग्य त्या ऊपाययोजना आखण्यात येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे येत्या काळात शाळा सुरू होणार नाहीत, असे संकेत वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

शाळा कधी सुरु होणार?

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सध्या तरी निर्णय झालेला नाही. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत , तेथील परिस्थिती पाहून 10-12 वी वर्ग सुरू करण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. पुढील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यात गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावात 10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरू करण्याची शक्यता आहे, असंही त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

CBSE Board Result 2021: 10 वी, 12 वीचा निकाल मान्य नसल्यास ऑगस्टमध्ये लेखी परीक्षा देता येणार : केंद्रीय शिक्षण मंत्री

11वी प्रवेशाबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कधी होणार?

(Nashik School Fee Issue Parents angry at sacred heart convent school)