
नाशिक (चंदन पूजाधिकारी) : “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझा विरोध नाहीय. . ओबीसी समाजाला आरक्षण खूप कमी आहे. त्यामुळे त्यांना वेगळे आरक्षण द्या असे माझं म्हण आहे, आणि हे मत माझं एकट्याचे नाही इतर अनेक नेत्यांचे हेच मत आहे. त्यांचे नाव घेऊन जरांगे का बोलत नाही?. मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला नाहीतर त्याला राजकीय वास येईल” असं छगन भुजबळ म्हणाले. ब्रिटनमधून वाघनखं आणली जाणार आहेत, त्यावरही छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, “लंडनमध्ये असलेल्या वाघ नखांच काहीतरी महत्त्व असेल, ते आल्यावर बघू”
राष्ट्रवादी काँग्रेसच चिन्ह आणि पक्षाबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. “कायदेशीर बाबी आहेत, यात आमचे नेते देखील लक्ष घालत आहेत” असं छगन भुजबळ म्हणाले. “मी सुरुवातीपासून कांदा व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याचे आव्हान करत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पहावे. आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न केले आहेत. व्यापाऱ्यांनी आता जास्त हट्ट करणे योग्य नाही. सरकारच्या कामात कोणी अडथळे आणत असतील तर पोलीस कारवाई करतील” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
डीजे, लेझर शो बद्दल भुजबळ काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी सण-उत्सवांच्या मिरवणुकीत वाजवल्या जाणाऱ्या डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर भाष्य केलय. मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता छगन भुजबळ यांनी सुद्धा डीजे, लेझर शो बद्दल भाष्य केलय. “मी आधी या विषयावर बोललो असतो, तर धर्म विरोधी आहे असे आरोप झाले असते. लेझर आणि डिजेमुळे अनेकांना त्रास झाले आहेत. लोकांना जर इजा होत असेल, तर सर्वांनी याचा विचार करायला पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले.