“नाशिककरांना विनंती, हे जगात मोठं स्थान”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं वेदोक्त प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली…

| Updated on: Apr 01, 2023 | 4:32 PM

काळाराम मंदिरात जाणार असल्याचे सांगत नाशिकराना त्यांनी विनंती केली आहे. हे जगात मोठं स्थान आहे याचं, त्यामुळे इथूनच वेदोक्त सर्वांना लागू करा असंही आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नाशिककरांना विनंती, हे जगात मोठं स्थान; राष्ट्रवादीच्या नेत्यानं वेदोक्त प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली...
Follow us on

नाशिक : माजी खासदार संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांना नाशिकच्या काळाराम मंदिरात महंतांनी वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केला. त्यानंतर त्यांनी त्या घटनेविषयी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला होता. यावेळी त्यांनी छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका असा इशाराही त्यांनी महंताना दिला होता. त्यानंतर राज्यात जोरदार खळबळ माजली आहे. त्यावरूनच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला इशारा दिला आहे.
या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले असून त्यांनी सांगितले आहे की, काळाराम मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेणार असून महंतांना आम्ही भेटणार आहे.

त्यानंतर ही व्यवस्था आता कधी संपणार या बद्दल विचारणा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनीम म्हटले आहे, मात्र हे आता किती दिवस चालणार असा संतप्त सवालही त्यांनीकेला आहे.

या प्रकरणावर बोलताना त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा दाखला देत ते म्हणाले की, हे वेदोक्त प्रकरण घडले ते सध्याच्या काळात वाईटच आहे असं सांगत त्यांनी म्हटले आहे की, शाहू महाराज हे पुढारलेल्या विचारांचे होते असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे की,कालचे वेदोक्त प्रकरण आणि पुराणोक्त प्रकरण आणखी किती दिवस चालणार आहे. अजूनही ही भूमिका मानली जात असेल तर ती काढून टाकली पाहिजे असंही त्यांनी म्हटले आहे.

संविधानविषयी बोलतानाही त्यांनी सांगितले की, संविधान प्रत ही मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी ठेवतो असं म्हणालो होतो मात्र ही माझी चूक होती.

कारण संविधानाची उंची खूप मोठी आहे आम्ही संविधान डोक्यावर ठेवतो. त्याच्यामुळे आम्ही जिवंत आहे असल्याचेही सांगत ती माझ्या हातून चूक झाली, मी असं बोलायला नको होतं अशीही त्यांनी आपली भूमिका मांडली.

जिथे महाराष्ट्राच्या गाधीचा मान ठेवला जात नाही तिथं आमचा काय ठेवला जाणार. मात्र महाराष्ट्राच्या गादीचा अपमान हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, वेदोक्त प्रकरणी आम्ही मंदिरात जाणार आहे, मात्र तिथे घोषणा दिली जाणार नाही अशी त्यांनी आपली भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी अचानक सनातन धर्म की जय अशा घोषणा कशा सुरू झाल्या. ही कुठंतरी प्लॅन स्ट्रेटर्जी आहे. त्यामुळे यामधून काहीतरी शिका असा त्यांनी बहुजनांना आव्हानही दिले आहे.

कोल्हापूरात कालीचरण महाराज यांनी नथुराम गोडसे यांनी जे केले ते योग्यच आहे असं वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, कालीचारणची लायकी काय आणि त्याचे शिक्षण काय आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. देशातील पहिला अतिरेकी हा नथुराम गोडसे आहे, त्यामुळे महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलणारा कालीचरन कोण असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

याबरोबरच त्यांनी काळाराम मंदिरात जाणार असल्याचे सांगत नाशिकराना त्यांनी विनंती केली आहे. हे जगात मोठं स्थान आहे याचं, त्यामुळे इथूनच वेदोक्त सर्वांना लागू करा असंही आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आम्ही काळाराम मंदिरात जाणार असून पोलिसांनी बळाचा वापर करून आम्हाला रोखलं तर आम्ही शूद्र आहे आणि हे मी महाराष्ट्राला कळेल, असं सांगत त्यांनी मला अडवण्याची चूक पोलिसांनी करू नये कारण पोलीस हे राज्य सरकारचे गुलाम आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.