Nashik Municipal Ward Structure | महापालिकेच्या प्रभागरचनेत नवा ट्विस्ट, चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी भाजप आग्रही, नगरविकास खाते अलर्ट मोडवर

| Updated on: Jul 31, 2022 | 3:52 PM

Nashik Municipal Ward Structure | भाजपने चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणुका घेण्याची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याकडून याविषयी अहवाल मागितला आहे.

Nashik Municipal Ward Structure | महापालिकेच्या प्रभागरचनेत नवा ट्विस्ट, चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी भाजप आग्रही, नगरविकास खाते अलर्ट मोडवर
प्रभाग रचनेचे त्रांगडे
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Nashik Municipal Ward Structure | नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेत आता नवा ट्विस्ट आला आहे. त्रिसदस्यीय प्रभागरचना (Tripartite divisional structure)तयार करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत भाजपने(BJP) पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचनेचा आग्रह धरला आहे. भाजपचे माजी नगरसेवक अजिंक्य साने (Ajinkya Sane) याविषयीची साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) 2021 मधील जनगणना अहवाल अद्याप अप्राप्त आहे. पण तोच जनगणनेचा (Censuses) आकडा गृहित धरुन प्रभाग रचना करणे अपेक्षित असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह पालिका निवडणुकांना हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडींआधारे प्रभाग रचना ठरवणे आवश्यक असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीकडे तातडीने लक्ष दिले आहे. त्यांनी नगरविकास खात्याला याप्रकरणात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाचे आदेश धाब्यावर

सर्वोच्च न्यायालयाने 4 मे 2022 आणि 20 जुलै 2022 च्या आदेशात 10 मार्च 2022 रोजी प्रभागरचनेबाबत जी स्थिती होती, त्या आधारेच महापालिका निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशच धाब्यावर बसवल्याचा तसेच चार सदस्यीय प्रभागरचना रद्द करून त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत अंमलात आणल्याचा आरोप साने यांनी केला.

हे सुद्धा वाचा

बावनकुळे यांची भेट

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. बावनकुळे आणि साने यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. 2021च्या जनगणनेचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे 2021 च्या जनगणनेच्या आधारेच प्रभागरचना आणि सदस्यसंख्या निश्चित करणे अपेक्षित आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्येत अनाकलनीय फुगवटा केला. त्यामुळे नाशिकसह राज्यभरातील महापालिकांच्या सदस्यसंख्येत केलेली वाढ बेकायदेशीर असल्याचे बावनकुळे आणि साने यांनी म्हटले आहे. साने यांनीही मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करीत त्रिसदस्यीय प्रभागरचना रद्द करण्याची मागणी केली आहे.

43 प्रभाग हे तीन सदस्यीय

नाशिकची एकूण लोकसंख्या 14,86,053 एवढी आहे. नाशिकमधील अनुसूचित जातीची लोकसंख्या 2,14,620 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1,07,456 एवढी आहे. नाशिक महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 19, अनुसूचित जमातीसाठी 10 आणि महिलांसाठी 52 जागा राखीव आहेत. महापालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. त्यापैकी 43 प्रभाग हे तीन सदस्यीय असून एक प्रभाग चार सदस्यीय आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. रमेश पवार हे नाशिक महापालिकेचे आयुक्त आहेत. तसेच पालिकेचे प्रशासकही आहेत.