“तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश नाही मग पाठिंबा द्यायचा कसा?”: भाजपचा ‘या’ नेत्याला थेट सवाल…

| Updated on: Jan 25, 2023 | 11:19 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली असली तरी सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याशिवाय पाठिंबा द्यायचा नाही असंच नकळत ठरले आहे.

तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश नाही मग पाठिंबा द्यायचा कसा?: भाजपचा या नेत्याला थेट सवाल...
Follow us on

नाशिकः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात लक्ष्यवेधी लढत होणार आहे ती उमेदवार महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील आणि अपक्ष म्हणून उभा असलेले सत्यजित तांबे यांची. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी अजूनही भाजपकडे जाहिरीरित्या पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या पाठिंब्याविषयी बोलताना स्पष्टच सांगितले आहे की, त्यांनी अजूनही आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा कसा देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सत्यजित तांबे यांनी भाजपकडे समर्थन मागितले नाही मात्र आता ही निवडणूक चार दिवसावर आली आहे. त्यामुळे या पाठिंब्याविषयी भाजप नेमकी काय भूमिका घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याकडे अजून पाठिंबा मागितले नसल्याचे सांगतात, तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी मात्र आम्ही भाजपकडे पाठिंबा मागणारच नाही अशी आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली असली तरी सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याशिवाय पाठिंबा द्यायचा नाही असंच नकळत ठरले आहे.

या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना कपिल पाटलांची शिक्षक भारती, टीडीएफ शिक्षक संघटना, मेडिकल असोसिएशन, एनडीएसटी संघटना, शिक्षक लोकभारती संघटना, महा ज्युनियर कॉलेज संघटना, प्राथमिक व उच्चमाध्यमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ या संघटनांचा पाठिंबा दर्शविल आहे.

तर शुभांगी पाटील यांना महाविकास अघाडी, जुनी पेन्शन संघटना, शिक्षक सेना, समाज कल्याण संघटना, आदिवासी आश्रम शाळा संघटना, युवा मल्हार संघटना, सुवर्णकार संघटना यांचा पाठिंबा आहे.

सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल करताना फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी केली होती मात्र आता सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितला नसल्यामुळे शुभांगी पाटील व सत्यजित तांबे यांच्यातील लढत लक्ष्यवेधी होणार आहे.