Ashok Kharat: धक्कादायक निकाल लावून देतो! अशोक खरात याचा खतरनाक ‘तोटका’; कोणती बांधली पूजा? ती महिला नेता SIT च्या रडारवर आता

Ashok Kharat Worship for Election: अशोक खरातच्या करारनाम्याच्या कथा संपता संपत नसल्याचे समोर येत आहे. अनेकांना चुना लावण्याच्या त्याच्या एकानंतर एक भानगडी समोर येत आहे. महिलांचे लैंगिक शोषण, बड्या राजकारण्यांचा महागुरू अशी त्याची प्रतिमा यापूर्वी होती. आता थेट निवडणुकीत जिंकून देण्यासाठी त्याने पूजा केल्याचे समोर येत आहे.

Ashok Kharat: धक्कादायक निकाल लावून देतो! अशोक खरात याचा खतरनाक तोटका; कोणती बांधली पूजा? ती महिला नेता SIT च्या रडारवर आता
अशोक खरात
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 24, 2026 | 2:25 PM

Ashok Kharat Worship for Election: नाशिकचा भामटा ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याचे कुख्यात कारनामे एकामागून एक समोर येत आहे. अनेक महिला त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडल्या आहेत. त्यांचे 300 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहे. शोषणाच्या या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजकारण्यांसोबत मिळून त्याने क्राइम सिंडिकेट चालवल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. राज्यातील बड्या नेत्यांचा तो महागुरू असल्याचे एव्हाना विविध पूजेवरून समोर आले आहे. सार्वजनिक रित्या अनेक जण आता आपण त्याचे चेले नसल्याची कबुली देत असले तरी त्यांचे फोटो बरेच काही सांगून जाते. या भोंदूबाबाने थेट निवडणुकीत जिंकून देण्यासाठी तोटका वापरल्याचे आणि पूजा बांधल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी आता विशेष तपास पथकाच्या रडारवर अनेक गोष्टी आल्या आहेत.

धक्कादायक निकाल लावून देतो

उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांशी संबंधित धक्कादायक माहिती समोर येत आहे. एक महिला नेत्या भोंदू अशोक खरातकडे ‘तोटका’ करण्यासाठी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. धक्कादायक निकाल लावून देतो म्हणत अशोक खरात याने या महिला नेत्याला पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. यापूर्वीही या भामट्याने अनेक निवडणुकांपूर्वी अशाच पूजा केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हे प्रकरण समोर येताच SIT कडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीत यशासाठी अनेक नेते खरातकडे गेल्याची सूत्रांची माहिती आहे. खरातच्या कार्यालयात संबंधित नेत्या आणि कुटुंब वारंवार येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. याविषयीचे CCTV फुटेज SIT च्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. आता खरातच्या खेटा करणाऱ्या या धुरंधर नेत्यांची पण वरात निघणार का, असा सवाल जनतेतून विचारल्या जात आहे. राजकीय पाठबळामुळेच खरातची महिलांच्या इभ्रतीवर बिनधास्त हात टाकण्याची हिंमत झाल्याचा आरोप जनतेतून करण्यात येत आहे.

मिरगाव येथील वॉचमनची कसून चौकशी

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे भोंदू अशोक खरातचा मोठा फॉर्म हाऊस आहे. एसआयटीने मिरगाव येथील फार्म हाऊसच्या वॉचमनची दिवसभर चौकशी केली. या चौकशी दरम्यान तुम्हाला काही संशय होता का? असा सवाल SIT टीम ने केल्याचं वॉचमनने सांगितलं. माझ्यासोबत मंदिराचे पुजारी आणि कर्मचाऱ्यांची देखील चौकशी झाल्याचं वॉचमनने सांगितलं. तर मला कोणतीही गोष्ट आढळली नाही, मी सहा महिन्यापासून इथे आलो आहे, अशी माहिती वॉचमन याने दिली.

Follow Us