“श्रीमंतांनीच आमदार, खासदार व्हायचं का?,” छत्रपती संभाजीराजे याचा सवाल

| Updated on: Jan 28, 2023 | 10:39 PM

पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य करायचं असेल, तर तो सामान्य माणूस झाला पाहिजे. ज्याच्याकडं पैसा तोच आमदार- खासदार होणार काय? ही परंपरा आम्हाला बदलून टाकायची आहे, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.

श्रीमंतांनीच आमदार, खासदार व्हायचं का?, छत्रपती संभाजीराजे याचा सवाल
छत्रपती संभाजीराजे
Follow us on

नाशिक : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका आज मांडली. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, गाव तिथे शाखा आणि घरोघरी स्वराज्य हा संकल्प हाती घेतला आहे. आतापर्यंत 500 शाखा झाल्या आहेत. लोकांच्या स्वराज्यकडून खूप अपेक्षा आहेत. सामान्यांना ताकद देण्यासाठी स्वराज्यची स्थापना केली. स्वराज्यचा अजेंडा पटल्यामुळे सुरेश पवार आमचे उमेदवार आहेत. सुरेश पवार निवडणुकीत चमत्कार घडविणार आहेत. प्रस्थापितांसमोर ते उभे आहेत. नाशिक आणि महाराष्ट्राला नवी दिशा देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

स्वराज्य हे सुराज्य व्हावं. यासाठी पाच टक्केतरी सुराज्य स्थापन करायचं आहे. या विचारमंचावर मोठा नेता नाही. आम्हाला आमदार, खासदार करायचं असेल तर तो शेतकरी झाला पाहिजे, असंही संभाजीराजे यांनी सांगितलं.

ही परंपरा बदलायची आहे

आम्हाला उद्या आमदार, खासदार करायचं असेल. पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य करायचं असेल, तर तो सामान्य माणूस झाला पाहिजे. ज्याच्याकडं पैसा तोच आमदार- खासदार होणार काय? ही परंपरा आम्हाला बदलून टाकायची आहे, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.

पदवीधर निवडणुकीत सामान्य माणूस निवडून येत नाही. पण आमचा उमेदवार चमत्कार घडविणार आहे. स्वराज्यची मुहूर्तमेढ नाशकातून होणार आहे. मी कुठलाही प्रस्ताव ठेवणार नाही. आम्ही सज्ज आहोत. आमचा उमेदवार स्ट्राँग आहे. भाजपने त्यांची भूमिका जाहीर केली नाही का केली नाही ते कळलं नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.

डार्क हॉर्स म्हणून आमचा घोडा

एवढ्या लोकांनी दखल घेतली म्हणून असं वाटत आहे की सुरेश पवार विजयी होतील. मी भाजपचा नाही. मॅच फिक्स झाली आहे की नाही ते निवडणुकीनंतर कळेल. डार्क हॉर्स म्हणून आमचा घोडा आहे, असंही संभाजीराजे यांनी सांगितलं.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक सुविधा जनतेला दिल्या आहेत. शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर 5 लाख रुपये तिथे दिले जातात. सध्या फक्त स्वराज्य वाढविण्यावर भर देणार आहे.