AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

St Worker Protest : अशा प्रकारची घटना कधीही योग्य नाहीच, पवारांच्या घारबाहेरील आंदोलनावर राज्यपालांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेला गृहमंत्री पद हवं आहे म्हणून तर हे घडवून आणलं नाही ना, अशी शंका भाजप नेते व्यक्त करत आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपकडे इशारा केला आहे. त्यामुळे जोरदार खडाखडी सुरू आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

St Worker Protest : अशा प्रकारची घटना कधीही योग्य नाहीच, पवारांच्या घारबाहेरील आंदोलनावर राज्यपालांची पहिली प्रतिक्रिया
शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलनावर राज्यपालांची प्रतिक्रियाImage Credit source: tv9
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 09, 2022 | 4:59 PM
Share

नाशिक : राज्यात सध्या एकच विषय गाजतोय तो म्हणजे शुक्रवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर झालेले एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रमक आंदोलन (St Worker Protest). मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्र्यांपर्यंत सर्व नेते या आंदोलनाची मूळंपाळं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात मात्र आता यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे पुन्हा नवा वाद पेटला आहे. शिवसेनेला गृहमंत्री पद हवं आहे म्हणून तर हे घडवून आणलं नाही ना, अशी शंका भाजप नेते व्यक्त करत आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपकडे इशारा केला आहे. त्यामुळे जोरदार खडाखडी सुरू आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल काय म्हणाले?

पवारांच्या घराबाहेर आंदोलनाबाबत बोलताना राज्यपाल म्हणाले, मुख्यमंत्री या विषयाला हाताळत आहेत, ते समजदार व्यक्ती आहेत. स्वतः शरद पवार मोठे आणि प्रतिष्ठित नेते आहेत. अशा प्रकारची घटनेला कोणीही योग्य म्हणणार नाही. त्यामुळे अशा घटना होऊ नये यासाठी सरकार लक्ष देईल. अशी प्रतिक्रिया रारज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या अमरावतीत पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आधी 150 ते 200 पोलिसांचा होता, मात्र आता बंदोबस्तात 300 पोलीस तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

या आंदोलनावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलकांचा हेतू पवार साहेब आणि सुप्रिया सुळेंना आणि पवार कुटूंबियांना इजा पोहोचवण्याचा असावा, असं माझं निरीक्षण आहे. त्यांना जर त्यांच्या भावना पोहचवाच्या होत्या तर त्यांनी निदर्शनं केली असती. एखादा व्यक्ती उद्दामपणे सातत्याने हिंसेची धमकी देतो त्यावर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई होणं आवश्यक होतं, असेही त्या म्हणाल्या आहेत. पोलिसांवर सातत्याने आरोप होत असल्यामुळे त्यांचे नितीधर्य खच्चलं की काय हे बघायला पाहिजे, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा लागाण्याच्या भीतीमुळे काही पोलीस अधिकारी निष्क्रिय झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Anand Paranjpe: तर आम्हीही दुप्पट चोप देऊ शकतो; आनंद परांजपे यांचा मनसेला इशारा

St Worker Protest : पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कट, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा

Pravin Darekar : सोमय्यानंतर प्रवीण दरेकरांनाही पोलिसांची नोटीस, मुंबै बँक प्रकरणात पुन्हा चौकशी होणार

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल