“भाडेतत्त्वावर माणसं गोळा करुन सभा घेण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्या जाणा”; अवकाळीवरून मुख्यमंत्र्यांना घेरले…

| Updated on: Mar 20, 2023 | 9:02 PM

शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यावरूनही विनायक राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आमचं नाव चोरलं,चिन्हं चोरला पण आमचा हिंदूत्ववाद नाही चोरु शकणार असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

भाडेतत्त्वावर माणसं गोळा करुन सभा घेण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्या जाणा; अवकाळीवरून मुख्यमंत्र्यांना घेरले...
Follow us on

मालेगाव/नाशिक : राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कोण करणार असा सवाल शेतकरी करत होते. त्यानंतर संप मिठला असला तरी ठाकरे गटाने आता शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोले केला आहे.
खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर रत्नागिरीतील खेडमधील सभेवरून जोरदार निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री आणि सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका असे भावनिक आवाहन त्यांनी त्यांनी केले आहे.

राज्यातील शेतकरी अनेक समस्यांनी ग्रस्त असताना मुख्यमंत्री सभा घेण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना विनायक राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना सभा घ्यायला वेळ आहे पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

राज्यभरात अवकाळीने थैमान घातले आहे. शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहेत तर दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे रखडले असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत नाहीत अशीही टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

एकीकडे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना भेटायला आणि बांधावर जाऊन त्यांची पाहणी करण्यासही त्यांना वेळ नाही. तर दुसरीकडे कृषीमंत्री रनिंग स्पर्धेत धावण्यात व्यस्त आहेत तर पालकमंत्री कोकण दर्शनाला गेले असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

शेतकऱ्यांना या अशा परिस्थितीत मदत मिळाली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. राज्यातही आणि केंद्रातही भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करायला काय हरकत आहे असा सवालही विनायक राऊत यांनी केला आहे.

विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर सभा घेण्यावरूनही जोरदार टीका केली आहे. भाडेतत्त्वावर माणसं गोळा करुन सभा घेण्यापेक्षा बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या असा सल्लाही खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेसाठी नवं काही केले नाही. महाविकास आघाडीचे ठराव रद्द करुन तेच ठराव पुन्हा मांडण्याचा कार्यक्रम सुरु ठेवला असल्याची टीका करण्यात आली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यावरूनही विनायक राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आमचं नाव चोरलं,चिन्हं चोरला पण आमचा हिंदूत्ववाद नाही चोरु शकणार असा टोलाही त्यांनी लगावला आहे.