दुधात कास्टिक सोडा, ग्राहकांच्या जीवाशी खेळ; अन्न, औषध प्रशासनाची मोठी कारवाई

| Updated on: Sep 04, 2023 | 7:55 PM

सणासुदीच्या तोंडावर तुम्ही जर घरातील वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी दूध वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दुधामध्ये साबणासाठी वापरण्यात येणारा कास्टिंग सोडा वापरण्यात येत होता. या छाप्यादरम्यान पोलिसांनी कास्टिंग सोडा तसेच धोकादायक कॉस्टिक सोडा यांचा मोठा साठा जप्त केला आहे.

दुधात कास्टिक सोडा, ग्राहकांच्या जीवाशी खेळ; अन्न, औषध प्रशासनाची मोठी कारवाई
Follow us on

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, नाशिक, ४ सप्टेंबर २०२३ : सणासुदीच्या दिवसात सर्वाधिक दूध किंवा दुधाचे पदार्थ वापरले जातात. आबाल वृद्धांपासून सगळ्यांकडून सर्वाधिक दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाण्याची आवड असते. पण, दुधात भेसळीचा प्रकार उघडकीस आला. भेसळ दुधाचा बाजार काही कारखान्यांनी मांडला आहे. याचं उदाहरण नाशिकमध्ये बघायला मिळालं आहे. नाशिक जिल्ह्यातील भेसळयुक्त दूध बनवणाऱ्यांना विरोधात कारवाई करण्यात आली. नाशिक जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणला. नाशिकच्या सिन्नर मिरगावमध्ये भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत कारवाई केली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाने संयुक्तिक कारवाई केली. लाखो लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे.

मिल्क पावडर, कास्टिक सोड्याचा वापर

पोलीस प्रशासन आणि अन्न, औषध प्रशासन यांनी सापळा लावून या कारखान्यावर अचानक छापा टाकला. त्या छाप्यादरम्यान मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोडा यापासून हे भेसळयुक्त दूध बनवलं जात होतं. हे पथकाच्या निदर्शनास आलं आणि त्यांना मोठा धक्का बसला.

कपडे धुण्यासाठी वापरला जातो कास्टिक सोडा

सिन्नर तालुक्यातील ओम सद्गुरु या दूध संकलन करणाऱ्या केंद्रावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रासायनिक मिल्क लिस्ट पावडर आणि कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा कास्टिंग सोड्याचा मोठा साठाही मिळून आला आहे. दुधाला घट्टपणा येण्यासाठी तसंच हे दूध जास्तीत जास्त दिवस टिकावं यासाठी कॉस्टिक सोडा तसंच अन्य पदार्थ वापरणे जातात.

कँसरसारखे गंभीर आजार होतात

मात्र याच पदार्थांमुळे कॅन्सरसारखे आजार देखील होतात. या दूध कारखान्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केल्याचं समोर आला आहे. अशा पद्धतीने भेसळीचे कुठलेही प्रकार नागरिकांना आढळल्यास त्यांनी तात्काळ अन्न औषध प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा असा आवाहन करण्यात आलंय.

सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक जिल्ह्यात भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात येत असल्याचा संशयावरून जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला. पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने ही धडक कारवाई केली आहे. प्रशासनाच्या या कारवाईने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याप्रकरणी दूध संकलन केंद्र चालकासह या केंद्राला रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या विरोधातही सिन्नर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.