भीमराव कांबळेला भर चौकात फाशी द्या, नसरापूर प्रकरणातील निकालानंतर नागरिकांची मागणी

Nasrapur Case : नरसापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी सोलापुरातील नागरिकांना केली आहे.

भीमराव कांबळेला भर चौकात फाशी द्या, नसरापूर प्रकरणातील निकालानंतर नागरिकांची मागणी
Nasrapur Bhimrao Kamble
Image Credit source: Google
| Updated on: Jun 29, 2026 | 3:43 PM

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या प्रकरणात आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. याआधी 26 जून रोजी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले होते, मात्र त्यावेळी निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. आज या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. अशातच आता आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी सोलापुरातील नागरिकांना केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भीमराव कांबळेला चौकात फाशी द्या…

नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा दिल्याबद्दल सोलापुरातील नागरिकांकडून निकालाचे स्वागत करण्यात आले. पीडीत चिमुकलीचे घर असलेल्या परिसरात नागरिकांकडून बॅनर दाखवत न्यायव्यवस्थेचे आभार मानण्यात आले. सरकारने हा सुटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला आणि न्यायालयाने तो 55 दिवसात निकाली काढला त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र केवळ निकाल देऊन न थांबता आरोपी भीमराव कांबळेला तात्काळ भर चौकात फाशी द्यावी अशी आमची मागणी आहे. नराधम कांबळेला भर चौकात फाशी दिल्याने भविष्यात अशा गोष्टी घडणार नाहीत असं सोलापुरातील नागरिकांनी म्हटलं आहे.

15 दिवस पुरावे गोळा केले

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले की, या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. जवळपास 15 दिवस पुरावे गोळा केले, साक्षीदार शोधून काढले. एक महिला अधिकारी विजयमाला पवार यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. बॅकग्राऊंडमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांचे देखील आभार मानले पाहिजे. अजय मिसर यांच्या टीमचे देखील आभार मानले पाहिजे.

1200 पानी चार्जशीट

पुढे बोलताना गिल यांनी सांगितले की, 1200 पानी अचूक चार्जशीट दाखल केले होते, सर्व 55 साक्षीदार समोर आले त्यांचं देखील आभार मानतो. नसरापूर आणि पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केले जात होते. भारतीय न्याय संहिता मधील तरतुदीनंतर दोनवेळा पंचनामा केला. दुसरा पंचनामा व्हर्चुअल पद्धतीने करण्यात आला. हा राज्यातील पहिला ऑनलाईन पंचनामा होता. संवेदनशील पद्धतीने तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली आहे.

Follow Us