रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाचा हाहा:कार; नौदल, सैन्यदलाच्या तुकड्या बचावकार्यात उतरल्या

पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या आहेत.

रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाचा हाहा:कार; नौदल, सैन्यदलाच्या तुकड्या बचावकार्यात उतरल्या
Chiplun Rain
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 9:24 PM

मुंबई : रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. येथे नदी, नाले तसेच ओढे पूर्णपणे भरले असून अनेक ठिकाणी पूर आला आहे. चिपळूनसारख्या ठिकाणी तर पूर्ण घरं पाण्याखाली गेली आहेत. या सध्याच्या परिस्थितीला समोर ठेवून आता पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील पूरस्थितीची अद्ययावत माहिती घेत आहेत. (Naval and Army units have also rescuing people who caught in heavy rain and flood of Ratnagiri and Raigad district )

एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकडया तैनात

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्हयांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तत्काळ उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमार्फत बचावकार्य

तसेच पुणे विभागातील संभाव्य पुरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्हयांमध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फतमदत व बचावकार्य करण्यात येत आहे.

एनडीआरएफ च्या 2 तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफ च्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी 25 जवानांची 2 पथके सज्ज झाली आहेत.

इतर बातम्या :

Chiplun Flood : राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा, कोकणातील पूरस्थितीवरुन राणेंचा घणाघात

घरात पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी घराबाहेर पडले, पाण्याचा अंदाज न आल्याने बाप-लेक नदीत वाहून गेले

Maharashtra Rain Live | चिपळूणच्या कोविड सेंटरच्या तळ मजल्यावर 10 फुटापेक्षा जास्त पाणी, 30 ते 40 जण अडकले

(Naval and Army units have also rescuing people who caught in heavy rain and flood of Ratnagiri and Raigad district )