APMC मार्केटमध्ये मास्क विरोधातील कारवाई दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, गुन्हा दाखल

| Updated on: Jun 30, 2021 | 10:51 AM

एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मास्क विरोधातील कारवाई दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांना एका व्यापाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. मार्केटमध्ये कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरु असताना ही घटना घडली. याप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे | APMC Market Trader

APMC मार्केटमध्ये मास्क विरोधातील कारवाई दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, गुन्हा दाखल
Navi Mumbai APMC Market
Follow us on

नवी मुंबई : एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मास्क विरोधातील कारवाई दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांना एका व्यापाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. मार्केटमध्ये कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरु असताना ही घटना घडली. याप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (APMC Market Trader Insult Security Personnel Who Came For Taking Actions For Breaching Mask Rule Case Filed).

नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच, मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी टाळण्यासाठी एपीएमसी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने देखील नागरिकांमध्ये जनजागृती करत नियम पाळण्याचे, मास्क वापरण्याचे तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मात्र, मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये काही बेजबाबदार व्यपाऱ्यांकडून निष्काळजीपणा सुरु असल्याने एपीएमसी प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. या कारवाईला काही मुजोर बेजबाबदार व्यपारी विरोध करतात, त्यातूनच अनेकदा वाद घडताना दिसतात.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत या व्यपाऱ्याने मास्क कारवाईसाठी गेलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावत जाऊन त्याला शिव्यांची लाखोली वाहिली.

नेमकं काय घडलं?

एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची कारवाई सुरु होती. या कारवाई दरम्यान D विंगमध्ये विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरु असताना या व्यपाऱ्याने पूर्ण मार्केटमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात या व्यपाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .बाजार आवारात सध्या गर्दी वाढल्याने प्रशासन तर्फे मास्क, सोशल डिस्टनसिंग पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र, व्यपारीच अश्लील शिवीगाळ करतील तर इतर लोक पण मास्क कारवाईबाबत विरोध करुन शिवीगाळ देतील,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

APMC Market Trader Insult Security Personnel Who Came For Taking Actions For Breaching Mask Rule Case Filed

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत नवे निर्बंध, दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, जाणून घ्या काय सुरु काय बंद?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, पण नवी मुंबईत अनेक नागरीक लसीकरणापासून वंचित