सावधान! मुंबईकरांवर पुन्हा मास्क घालण्याची वेळ, पण या कारणामुळे…

| Updated on: Jan 10, 2023 | 1:05 PM

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील नागरीकांवर पुन्हा मास्क घालण्याची वेळ येणार आहे.

सावधान! मुंबईकरांवर पुन्हा मास्क घालण्याची वेळ, पण या कारणामुळे...
AIR POLLUTION IN MUMBAI
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : सोमवारी रात्रीपासून मुंबईसह, नवी मुंबई (NAVI MUMBAI) परिसरात दिवसा गरम आणि रात्री थंडी असा बदल वातावरणात जाणवत आहे, याचा परिणाम हवेच्या (AIR) गुणवत्तेवर होत आहे. आणखी दोन दिवस (TWO DAYS) जर असेच वातावरण राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.

हवेची गुणवत्ता नोंदविणाऱ्या ‘सफर’ या प्रणालीमध्ये मंगळवारी मुंबई आणि नवी मुंबईतील हवा खराब असल्याची नोंद करण्यात आली आहे. वरळी, भांडुप, बोरिवली येथील हवेला ‘वाईट’ असा शेरा देण्यात आला आहे. तर, माझगाव, मालाड, कुलाबा, मुंबई शहर आणि बीकेसी या परिसराला ‘अती वाईट’ स्थितीचा शेरा देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

 

‘सफर’ने नवी मुंबई येथील हवा दर्जा निर्देशांक ३२२ आणि चेंबूर येथील दर्जा निर्देशांक ३०३ असा नोंदवून अतिशय वाईट शेरा मारला आहे. मुंबईत हवेची गुणवत्ता मध्यम स्वरुपाची आहे. हवेचा वेग मंदावला असल्याने वातावरणात प्रदूषके साचत असुन पुढील दोन दिवस अशी स्थिती राहिल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवेत झालेल्या या बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, कफ, घशाला कोरड पडणे, अंगदुखी, मळमळ आदी त्रास होत आहे. त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असुन फुफ्फुसाचे विकार असलेल्यांना अधिक धोका पोहोचेल अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यावर उपाय म्हणून अशा व्यक्तींनी मास्क वापरावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.