वाशीतील शाळेत ‘जय श्री राम’ म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना केलं निलंबित, मग मनसेचा कार्यकर्त्यांनी…

| Updated on: Jun 16, 2023 | 12:08 PM

"सोमवारी काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या मधल्या सुट्टीच्यावेळी साडेनऊच्या सुमाराम ओरडून गोंधळ घातला होता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता, त्यांना शाळेच्या प्रशासन कार्यालयात बोलावून गोंधळ घातल्याबद्दल चांगलचं खडसावलं होतं.

वाशीतील शाळेत जय श्री राम म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना केलं निलंबित, मग मनसेचा कार्यकर्त्यांनी...
MNS claims Vashi convent school rusticated students for raising Jai Shri Ram slogan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी मुंबई : काल वाशीतील सेंट लॉरेंस या कॉन्व्हेंट (St Lawrence School in Vashi) शाळेत विद्यार्थ्यांनी ‘जय श्री राम’चा नारा (“Jai Shri Ram” slogan) दिल्यामुळे त्यांच्या शाळेने कारवाई केली होती. विद्यार्थ्यांवर ज्यावेळी कारवाई झाली, त्यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते शाळेच्या बाहेर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पालक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी कारवाईच्या विरोधात शाळेच्याबाहेर आंदोलन सुध्दा केलं. मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी त्यावेळी तिथ शाळेतील व्यवस्थापनाला सांगितलं की, शाळेतील विद्यार्थ्यांवरती कारवाई मागे घेतली नाहीतर, शाळेची तोडफोड करण्यात येईल.

ज्यावेळी ‘जय श्री रामचा’ नारा विद्यार्थी देत असल्याचे शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आले, त्यांनी विद्यार्थ्यांना बोलवून कारवाई केली. त्याचबरोबर त्यांच्या पालकांना या गोष्टीची कल्पना सुद्धा दिली. त्यापैकी चार विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी मुख्याध्यापकांची भेट घेतली आहे. दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी नारा दिला आहे. विद्यार्थ्यांची बदनामी झाल्यामुळे पालक आणि मनसेचे कार्यक्रर्ते आक्रमक झाले होते.

मुंबईचे मनसेचे कार्यकर्ते संदेश डोंगरे म्हणाले की, “सध्या जो काही प्रकार झाला आहे. तो अस्वीकार्य असा आहे. शाळेच्या कारवाईचा आम्ही निषेध केला आहे. सगळी मुलं दहावीच्या वर्गात शिकत आहेत. सध्या त्यांचं महत्त्वाचं वर्षे असल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होईल.

हे सुद्धा वाचा

“संदेश डोंगरे आणि त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी सेंट लॉरेंस शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा केनेडी यांचीही भेट घेतली. त्यानंतर शाळेने केलेली कारवाई मागे घेतली आहे. त्याचबरोबर माफीनामा पत्र सुध्दा जाहीर केले आहे.” असं मनसेच्या नेत्यांनी सांगितले.

शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी पत्रात म्हटले आहे की, “सोमवारी काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या मधल्या सुट्टीच्यावेळी साडेनऊच्या सुमाराम ओरडून गोंधळ घातला होता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता, त्यांना शाळेच्या प्रशासन कार्यालयात बोलावून गोंधळ घातल्याबद्दल चांगलचं खडसावलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या पालकांना सुध्दा या गोष्टीची कल्पना दिली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत शिस्त लागावी म्हणून हे सगळं केलं असल्याचं मुख्याध्यापिका केनेडी यांनी सांगितलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कसल्याची प्रकारचे नुकसान होणार नाही.”

झालेल्या प्रकारामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असतील, किंवा कुणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी माफी मागते असं मुख्याध्यापिका म्हणाल्या आहेत.