सिडको सदनिका सोडतधारकांचा दुरुस्ती देखभाल खर्च माफ करा, सोशल मीडियावर विशेष मोहीम

| Updated on: May 27, 2021 | 11:59 AM

मनसेने  #CidcoWaiveOffOtherCharges हा हॅशटॅगही वापरत सोशल मीडियावर मोहीम राबवली आहे. (MNS Demand Cidco Waive Off Other Charges)

सिडको सदनिका सोडतधारकांचा दुरुस्ती देखभाल खर्च माफ करा, सोशल मीडियावर विशेष मोहीम
Follow us on

नवी मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे सिडको सदनिका सोडतधारकांचा दुरुस्ती देखभाल खर्च माफ करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने  #CidcoWaiveOffOtherCharges हा हॅशटॅगही वापरत सोशल मीडियावर मोहीम राबवली आहे. या मोहिमेला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत आहे. (MNS Demand Cidco Waive Off Other Charges)

नेमकं प्रकरण काय?

2018-19 मध्ये सिडको सदनिका सोडतधारकांपैकी जवळपास 6 हजार सोडतधारकांनी घराचे पूर्ण पैसे भरले होते. या सोडतधारकांना या घरांचा ताबा 8 ते 9 महिन्यांपूर्वी मिळणे अपेक्षित होते. मात्र अद्याप या धारकांना घराचा ताबा मिळालेला नाही. यातील अनेकांनी घरासाठी कर्ज काढले आहे. त्याचा मासिक हफ्ता त्यांना भरावा लागत आहे. त्याशिवाय घराचे घरभाडेही भरावे लागत आहे.

कोरोनाच्या आर्थिक संकटात हा दुहेरी बोजा गरीब सोडतधारकांसाठी असह्य होत आहे. यामुळे अशा सोडतधारकांचे प्रत्येकी 58००० हजार रुपये दुरुस्ती देखभाल खर्च Other Charges माफ करावा, अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी काही दिवसापूर्वी केली होती.

सोशल मीडियावर विशेष मोहिम

ही मागणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सिडको चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यासमोर मांडण्यासाठी सोशल मीडियावर विशेष मोहिम राबवली. #CidcoWaiveOffOtherCharges हा हॅशटॅग वापरुन सिडको सदनिका सोडतधारकांचा दुरुस्ती देखभाल खर्च माफ करावा, अशी मागणी करण्यात आली.

जोरदार प्रतिसाद

सध्या सोशल मीडियावर हा टॅग ट्रेंड होत असून जवळपास चार हजारांहून अधिकांनी यावर ट्विट केले आहेत. यामुळे या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या ट्विटर हॅशटॅग मोहिमेच्या माध्यमातून तरी सरकारला गरीब सोडतधारकांच्या भावना समजतील अशी आशा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली.

1 जुलै 2021 पासून घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्यात येणार

सदर महागृहनिर्माण योजनेतील ज्या अर्जदारांनी घरांचे सर्व हफ्ते भरले आहेत, त्यांना बाकी असलेले किरकोळ शुल्क भरण्यास 1 जून 2021 पासून 1 महिन्याची मुदत देण्यात येईल. 1 जुलै 2021 पासून घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. हफ्ते थकीत असलेल्या अर्जदारांना यापूर्वीच हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही हजारो कुटुंबांचे हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे. यामुळे हा निर्णय म्हणजे ऐन ग्रीष्मामध्ये आलेली शीतल हवेची झुळूक, अशीच भावना या अर्जदारांच्या मनामध्ये असणार आहे. (MNS Demand Cidco Waive Off Other Charges)

संबंधित बातम्या : 

सिडकोच्या लॉटरी धारकांसाठी खूशखबर, ‘या’ दिवशी मिळणार ताबा

सिडकोची 65 हजार घरांची लॉटरी लांबणीवर, पझेशनसाठीही आणखी 5 महिने प्रतीक्षा