नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : सिडको घेराव आंदोलनापूर्वी खबरदारी, अनेक महत्त्वाचे रस्ते बंद, मुंबई-पुणे वाहतूकीतही मोठे बदल

| Updated on: Jun 22, 2021 | 10:49 AM

येत्या 24 जूनला सिडकोला 1 लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहे.

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : सिडको घेराव आंदोलनापूर्वी खबरदारी, अनेक महत्त्वाचे रस्ते बंद, मुंबई-पुणे वाहतूकीतही मोठे बदल
Traffic (फोटो प्रातनिधिक)
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीकडून या विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहे. यासाठी येत्या 24 जूनला सिडकोला 1 लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते 24 जूनला बंद करण्यात आले आहे. (Navi Mumbai airport naming controversy CIDCO Gherao Protest Traffic route change)

नवी मुंबईत येणाऱ्या – जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. सिडको घेराव आंदोलनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 24 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे.

तर कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

24 जूनला सिडकोला घेराव घालणार

गेल्या “10 जूनला झालेल्या भव्य आणि आदर्श अशा मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधण्याबरोबरच वाहवा मिळवली. ‘निर्धार पक्का दिबासाहेबांचेच नाव पक्का’ ही प्रामाणिक भूमिका घेत आंदोलनाचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. आता रस्त्यावर उतरून सिडकोला घेराव घातला जाणार आहे.”

“दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. ज्येष्ठ आणि तरुणांची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत आहे. दुसरीकडे महिलाही मागे राहिल्या नाहीत. 24 जूनला योगायोगाने याच दिवशी वटपौर्णिमा आहे. असे असले तरी भूमिपुत्र सावित्रींनी यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. या लढाईच्या अनुषंगाने आपल्या सौभाग्याला अधिक बळ देण्यासाठी सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करु, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचा नाव मिळेपर्यत या संघर्षात महिलांचाही सहभाग राहणार आहे. तशीही तयारी महिला मंडळाकडून जोरदार सुरु आहे,” अशीही माहिती देण्यात आली.

(Navi Mumbai airport naming controversy CIDCO Gherao Protest Traffic route change)

संबंधित बातम्या : 

VIDEO: बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे

बाळासाहेबांबद्दल ‘त्यांना’ किती आदर हे समोर आलं, शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार

बाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली