VIDEO: बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे

हेमंत बिर्जे

हेमंत बिर्जे | Edited By: भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Jun 21, 2021 | 1:23 PM

नवी मुंबई विमानतळ स्वतंत्र नाही. हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असलं पाहिजे. (Navi Mumbai International Airport Name Issue)

VIDEO: बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे
राज ठाकरे

मुंबई: नवी मुंबई विमानतळ स्वतंत्र नाही. हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असलं पाहिजे, असं सांगतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. राज यांच्या या भूमिकेनंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (MNS Raj Thackeray first reaction in Navi Mumbai International Airport Name Issue)

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाबाबतची वस्तुस्थिती मांडली. प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची त्यांची मागणी आहे. सरकारची भूमिका आहे बाळासाहेबांचं नाव देण्याची. त्याच्यातून हा संघर्ष सुरु आहे. मोर्चे, धरणं सुरु आहे. माझा पाठिंबा घेण्यासाठी ते आले होते. मी वस्तूस्थिती समोर ठेवली. कोणतंही विमानतळ येतं, ते शहराबाहेर येतं. तेव्हाची मुंबई पकडली तर ते विमानतळ सांताक्रूझला गेलं. त्यावेळी मुंबई विकसित झालेली नव्हती. मग वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि मग त्याला सांताक्रुझ विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलं, असं राज म्हणाले.

कंपनीने काय सांगितलं?

मागे जेव्हा असं विमानतळ बनवायचं ठरलं. तेव्हा जीव्हेके कंपनीला मी विचारलं हे कसलं विमानतळ आहे? त्यावर आताचं विमानतळ आहे ते डोमेस्टिक असेल, आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. आता जे विमानतळ नवी मुंबईत होत असलं तरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनच टेक ऑफ होणार आहे. त्यासाठी शिवडी-न्हावाशेव रोड होत आहे. ते मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळेच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार, असं कंपनीने मला सांगितलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखलं जाईल

मुंबई विमानतळाचं ते एक्स्टेंशन आहे नवी मुंबईत. आंतराराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचंच नाव असेल असं मला तर वाटतं. विमानतळांना नाव देण्याचं वगैरे हे केंद्र सरकार ठरवतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच होईल. बाळासाहेब हे आदरणीय आहेत, दि. बा. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. असं असलं तरी नवी मुंबई विमानतळ हा मुंबई विमानतळाचा विस्तार असल्याने त्याला शिवरायांचं नाव देणंच उचित ठरणार आहे. नवी मुंबईत असले तरी विमानतळ हे मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखलं जाणार आहे, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

महाराजांचंच नाव राहणार

इथे जागा नसल्यामुळे नवी मुंबईत विमानतळ होतंय. त्यामुळे त्या विमानतळालाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल असं मला वाटतंय. या विमानतळाला अजून पाच एक वर्ष लागतील, असं सांगतानाच हा वाद जाणीवपूर्वक होतोय की नाही याची मला कल्पना नाही, पण आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार आहे, असं ते म्हणाले. आज बाळासाहेब असते तर त्यांनीही विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तर विषयच संपला

नवी मुंबईतील विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं तर आमचा विषयच संपला. आम्ही महाराजांच्या नावाला विरोध करणार नाही, असं कृती समितीने स्पष्ट केल्याचं राज म्हणाले. शिवाजी महाराजांच्या नावावर वाद होऊच कसा शकतो, असा सवालही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला. (MNS Raj Thackeray first reaction in Navi Mumbai International Airport Name Issue)

 

संबंधित बातम्या:

मराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत

प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है!

बाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली

(MNS Raj Thackeray first reaction in Navi Mumbai International Airport Name Issue)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI