मराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत

मराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत
छगन भुजबळ, पालकमंत्री नाशिक

छगन भुजबळ Chhagan Bhujbal speechणाले, "माझा किंवा राष्ट्रवादीचा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध नाहीच. पण मराठा आरक्षणाला माझा विरोध असल्याचं आहे.

चंदन पुजाधिकारी

| Edited By: सचिन पाटील

Jun 21, 2021 | 12:08 PM

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांच्या नेतृत्त्वात दुसरा मराठा मूक मोर्चा आज नाशिकमध्ये होत आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चास्थळी हजेरी लावली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. भुजबळ म्हणाले, “माझा किंवा राष्ट्रवादीचा मराठा आरक्षणाला विरोध नाहीच. पण मराठा आरक्षणाला माझा विरोध असल्याचं भासवलं जात आहे. माझी आणि संभाजीराजेंची भेट होते आहे ही चांगलीच गोष्ट आहे”. (Maharashtra Minister Chhagan Bhujbal Nashik Maratha Morcha speech said myself and NCP always support Maratha reservation)

मला काल आपल्या कार्यकर्त्यांनी आमंत्रण दिलं. छत्रपतींनीदेखील मला फोन केला. मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मताशी कोणाचंही दुमत नाही. माझ्या पक्षाची देखील तीच भूमिका आहे. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावं ही सगळ्यांची भूमिका आहे. अनेक अडचणी आहेत. ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठ्यांच्याविरोधात नाहीत. दोन्ही समाज अडचणीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण नाही आणि ओबीसींच आरक्षण काढलं, त्यामुळे दोन्ही समाजासमोर ही अडचण निर्माण झाली आहे, असं भुजबळ म्हणाले.

ओबीसी आणि मराठा समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न

कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर अडचणी निर्माण होतात. काही लोक ओबीसी आणि मराठा समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो योग्य नाही. शाहू फुले आंबडेकर हे आमचे दैवत आहेत. शाहू महाराजांचे वंशज समंजस, उतावीळ नाहीत आणि काय गाठायचं आहे हे त्यांना माहिती आहे. सामाजिक तेढ निर्माण होण्याचं कारण नाही. मराठा समाजाच्या प्रश्नाला भुजबळने कायम सभागृहातदेखील पाठिंबा दिला. पण भुजबळ आपला दुष्मन असल्याचं मत तयार करण्याचा काहींचा प्रयत्न असतो, असा आरोप छगन भुजबळांनी केला.

सगळ्यांना सोबत घेऊन जात असल्याने संभाजी महाराजांचं अभिनंदन. आपला लढा व्यवस्थेशी आहे. सारथीबाबतच्या मागण्या अजितदादा आणि इतरांनी तातडीने मंजूर केल्या. चर्चेशिवाय मार्ग नाही, असंही भुजबळांनी सांगतिलं.

VIDEO : छगन भुजबळ यांचं भाषण

संबंधित बातम्या 

Sambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE

Breaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें