कोरोना रुग्णांची वाढ, नवी मुंबईत 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले, मनपा आयुक्तांचे आदेश

| Updated on: Jul 15, 2021 | 9:10 PM

नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महानगरपालिकेने 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवसायिक व नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेनं केलंय.

कोरोना रुग्णांची वाढ, नवी मुंबईत 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले, मनपा आयुक्तांचे आदेश
नवी मुंबई महापालिका
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महानगरपालिकेने 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवसायिक व नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी हे पाऊल उचलण्यात आलं.

झोपडपट्टी परिसरात रुग्ण नियंत्रणात असले तरी सिडको विकसित नोडमध्ये नवीन रुग्णांची वाढ होत आहे. सीबीडी बेलापूर परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. नेरुळ, कोपरखैरणे, वाशी परिसरातही प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाने शहरातील पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी या प्रमाणावर आधारीत विविध आर्थिक व सामाजिक अॅक्टिव्हिटीज विचारात घेऊन 5 स्तर जाहीर केले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश होत आहे. यामुळे मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी आदेश काढून निर्बंध 19 जुलैपर्यंत वाढविले.

2 आठवड्यापासून सुरु असलेले नियम यापुढेही लागू होणार आहे. निर्धारीत वेळेतच व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवावी. नागरिकांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

नवी मुंबईमध्ये 100 रुग्ण वाढले

नवी मुंबई शहरात 200 रुग्ण वाढले असून 115 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 3 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 1782 झालाय. शहरातील 466 रुग्ण घरामध्येच उपचार घेत आहेत. उपचार सुरु असलेल्यांपैकी 101 जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

हेही वाचा :

मुंबई APMC मार्केटमधील मसाला आणि धान्य बाजार उद्या बंद

रिक्षा भाड्याच्या वादातून प्रवाशांकडून आधी शाब्दिक चकमक, नंतर थेट मारहाण, रिक्षाचालक महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

लहान मुलांना न्युमोकोकल आजाराचा धोका, नवी मुंबईत पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात

व्हिडीओ पाहा :

Navi Mumbai Municipal corporation impose restriction up to 19 july amid corona