रिक्षा भाड्याच्या वादातून प्रवाशांकडून आधी शाब्दिक चकमक, नंतर थेट मारहाण, रिक्षाचालक महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षाचालक महिलेला प्रवाशांकडून मारहाण करण्यात आलीय.

रिक्षा भाड्याच्या वादातून प्रवाशांकडून आधी शाब्दिक चकमक, नंतर थेट मारहाण,  रिक्षाचालक महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु
रिक्षाचालक महिलेला प्रवाशांकडून मारहाण
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 5:01 PM

नवी मुंबई : नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षाचालक महिलेला प्रवाशांकडून मारहाण करण्यात आलीय. प्रवाशांनी महिला रिक्षा चालकासोबत भाड्याच्या वादातून आधी शाब्दिक वाद घातला. त्यानंतर त्याचे रूपांतर माणामारीत झाले. सविता बेले असं मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेला मारहाण करताना बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पण कुणीही मध्यस्थी करुन वाद सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.

नेमके प्रकरण काय ?

अबोली महिला रिक्षाचालक महिलेला चार प्रवाशांनी रिक्षा भाडेवरून वाद घालून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. महिलेला मारहाण करणाऱ्या प्रवाशांमध्ये पती, पत्नी, मुलगी, आणि मुलगा अशा चार जणांचा समावेश आहे. या प्रकरणावरुन अबोली महिला रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत आणि बेलापूर नेरुळ विभागीय अबोली महिला रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष अंजना शिंदे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक शाम शिंदे यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालक महिला रुग्णालयात दाखल

यासंदर्भात आतापर्यंत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे रिक्षाचालक महिलेस वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. असाच प्रकार अबोली महिला रिक्षा चालकांसोबत घडत राहिला तर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याखेरीज पर्याय नाही, असे मत संस्थापक-अध्यक्ष संतोष भगत यांनी व्यक्त केले.

चित्रा वाघ यांच्याकडून घटनेची दखल

या सर्व प्रकरणाची दखल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील घेतली. त्यांनी अबोली रिक्षा चालक महिलांशी संवाद साधला. विविध क्षेत्रातील महिलांप्रमाणेच अबोली रिक्षा चालक महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक काम करणे गरजेचे आहे. सरकारने एक उपाय योजनांची पॉलिसी आखणे गरजेचे आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाही, हे सरकार महिलांच्या बाबतीत घडत असलेले गुन्हे कधी गांभीर्याने घेणार? असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.

दरम्यान, मारहाण झालेल्या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला कोविड सेंटरला हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे रिक्षाचालक महिलेला कुणालाही भेटता आले नाही (Rickshaw puller woman beaten up by passengers in New Mumbai).

हेही वाचा : 

काळ्या पिशवीत कोहळा, त्यावर टाचणी टोचून मुलीचा फोटो, शिरुरच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार, गावात खळबळ

कपाटाचे कुलूप दुरुस्त करायला बोलावलं, दोघांनी कपाटातून दागिन्यांसह 69 हजार लांबवले

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.