कपाटाचे कुलूप दुरुस्त करायला बोलावलं, दोघांनी कपाटातून दागिन्यांसह 69 हजार लांबवले

दोघा जणांनी कपाटातील 52 हजारांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने, त्याचबरोबर कपाटात ठेवलेले 17 हजार रुपयांची रोकड असा एकूण 69 हजार रुपयांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला.

कपाटाचे कुलूप दुरुस्त करायला बोलावलं, दोघांनी कपाटातून दागिन्यांसह 69 हजार लांबवले
कपाटाचे कुलूप दुरुस्त करण्याच्या बहाण्याने चोरी
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 1:32 PM

धुळे : कपाटाचे नादुरुस्‍त कुलूप दुरुस्‍त करण्यासाठी बोलावणे धुळ्यातील कुटुंबाला चांगलेच महागात पडले. कपाटाच्‍या कुलुपाची दुरुस्‍ती करण्यासाठी आलेल्‍या दोघांना हातचलाखीने कपाटातील दागिने आणि रोख रक्‍कम लंपास केली. साक्री तालुक्‍यातील खोरी या गावात हा प्रकार घडला होता. पोलिसांनी आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केलं आहे.

नेमकं काय घडलं?

धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील खोरी या गावातील राहुल हिरामण भामरे यांच्या घरातील खराब झालेल्या कपाटाच्या कुलुपाची दुरुस्ती करण्यासाठी दोघे जण आले होते. दोघा जणांनी कपाटातील 52 हजारांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने, त्याचबरोबर कपाटात ठेवलेले 17 हजार रुपयांची रोकड असा एकूण 69 हजार रुपयांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर राहुल भामरे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

एकाच्या मुसक्या आवळल्या

या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला चोरी संदर्भात गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक पथक नंदुरबार येथे पाठवले असता, दोन चोरट्यांपैकी एकाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.

आरोपी सराईत, इतर चोऱ्यांचीही कबुली

ताब्यात घेतलेल्या संशयिताने या संदर्भातील चोरीची कबुली दिली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे देखील तपासादरम्यान उघडकीस आले आहे. आणखी काही ठिकाणी चोरी केली असल्याचे देखील या चोरट्याने कबूल केले आहे. त्याच्याकडून इतर ठिकाणी चोरी केलेले आणखी काही सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या चोरट्याच्या साथीदाराचा देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाद्वारे शोध घेण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात कामाची संधी, आता करतो मोबाईलची चोरी, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

म्होरक्या येरवडा तुरुंगात, टोळीच्या सदस्यांची मौजमजेसाठी चोरी, दोघे अटकेत

(Dhule Thief arrested for stealing Gold and cash while repairing cupboard lock)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.