म्होरक्या येरवडा तुरुंगात, टोळीच्या सदस्यांची मौजमजेसाठी चोरी, दोघे अटकेत

आदित्य बसवराज दोड्डीमनी, हणमंतू गाडीवडर असे अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. त्या दोघांनी मिळून कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांची दुकाने फोडली होती

म्होरक्या येरवडा तुरुंगात, टोळीच्या सदस्यांची मौजमजेसाठी चोरी, दोघे अटकेत
सोलापुरात दोघांना अटक

सोलापूर : टोळीचा म्होरक्या जेलमध्ये गेल्यानंतर दुकाने फोडणाऱ्या टोळीतील दोघा सदस्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. चोरांच्या टोळीचा म्होरक्या पुण्यातीस येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

व्यापाऱ्यांची दुकाने फोडली

आदित्य बसवराज दोड्डीमनी, हणमंतू गाडीवडर असे अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. त्या दोघांनी मिळून कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांची दुकाने फोडली होती. चोरी करुन दुकानातील मुद्देमाल त्यांनी लंपास केला होता. पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

मौजमजा करण्यासाठी चोरी 

पोलिसांनी अटक केलेले दोघे यापूर्वी आपल्या सहकाऱ्यासोबत चोऱ्या करत होते, पण त्यांची नावे कधी पुढे आले नाहीत. त्यांचा सहकारी एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत पुणे येथील येरवडा कारागृहात गेला. त्यानंतर दोघांनी स्वतंत्रपणे चोऱ्या करण्यास सुरुवात केली असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. ही चोरी मौजमजा करण्यासाठी करत असल्याचं आरोपींनी पोलिसांच्या तपासात कबूल केल्याची माहिती आहे.

नागपूरमध्ये एटीएममधून हायटेक चोरी

दुसरीकडे, एटीएममधून पैसे काढायचे मात्र त्याची नोंद कोणत्याही खात्यावर न होता सरळ बँकतून पैसे मात्र जात होते. हायटेक पद्धतीचा वापर करुन नागपुरातील वेगवेगळ्या भागातील एटीएममधून पैसे चोरणाऱ्या सायबर गॅंगला नुकतंच नागपूर पोलिसांनी जयपूरमधून अटक केली आहे. अनिस अब्दुल गफ्फुर आणि मोहमद तारीफ उमर हरियाणा अशी आरोपींची नावं आहेत. त्यांनी देशभरात अशाप्रकारे लूट केली असून त्यांची मोठी गॅंग असण्याचा संशय पोलिसांना आहे.

संबंधित बातम्या :

एटीएममधून हायटेक चोरी, सायबर गॅंगला नागपूर पोलिसांकडून जयपूरमध्ये अटक

हॉटेल पार्सल ते मसाजर घरी पाठवून छळ, वसईतील तरुणीला ऑनलाईन मित्राकडून त्रास

(Solapur Theft Two Thieves arrested after Gang leader jailed in Yeravda)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI