AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात कामाची संधी, आता करतो मोबाईलची चोरी, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या झुंड चित्रपटात काम केलेला युवक मोबाईल चोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या युवकाने त्याच्या टोळीसोबत अनेक मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात कामाची संधी, आता करतो मोबाईलची चोरी, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
NAGPUR MOBILE CRIME
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 7:35 PM
Share

नागपूर : अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या झुंड चित्रपटात काम केलेला युवक मोबाईल चोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या युवकाने त्याच्या टोळीसोबत अनेक मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. प्रियांशू क्षेत्री असे या आरोपीचे नाव आहे. झुंड हा चित्रपट फुटबलॉशी संबंधित असल्यामुळे या चित्रपटात त्यालाही काम करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, सध्या हा एक मोबाईल चोर असून त्याने त्याच्या साथीदारांसोबत आतापर्यंत अनेक मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. मौज-मजा करण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने आरोपींनी मोबाईल चोरीचा मार्ग अवलंब होता असा खुलासा झाला आहे. (young boy acted with Amitabh Bachhan has been arrested in crime of mobile theft)

मोबाईल चोरी करताना पोलिसांनी रंगेहात पकडले

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेमधील प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळणाऱ्या टोळीचा शोध गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. लोहमार्ग पोलीस या टोळीच्या मागावर होते. दरम्यान या शोधामध्ये एका प्रियांशू नामक आरोपीला मोबाईल चोरी करताना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या आणखी दोन साथीदारांचे नाव समोर आले. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रियांशू क्षेत्री, शुभम जांभुळकर आणि सतेंद्र यादव या तीन आरोपींचा समावेश आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे 14 मोबाईल जप्त केले आहेत.

आरोपीला झुंड चित्रपटात काम करण्याची संधी

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रियांशू क्षेत्री हा चांगला फुटबॉलपटू आहे. त्याची फुटबॉल खेळण्याची कला पाहून त्याला अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या झुंड या चित्रपटात काम करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, नंतर मौज-मजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांना घेऊन मोबाईल चोरी करण्याचा मार्ग अवलंबला.

एकूण 14 मोबाईल जप्त करण्यात आले

दरम्यान, या तिघांकडून आतापर्यंत 14 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे तिन्ही आरोपी मोबाईलची चोरी करत असत. तसेच चोरलेले मोबईल कमी पैशांमध्ये विकायचे. त्यानंतर मिळालेल्या पैशातून हे आरोपी मौजमजा करायचे. चोरांच्या या चोरीची चांगलीच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

इगतपुरीतील रेव्ह पार्टी प्रकरण, 5 आरोपींना जामीन 20 जणांचा जामीन अर्ज फेटाळला, हीना पांचाळचं काय झालं?

नागपुरात 30 दिवसात 19 खून, टीव्ही आणि इंटरनेटवरील क्राईम शोचा परिणाम

फोनवरुन शिवीगाळ का केली? जाब विचारायला गेलेल्या दोघांची पुण्यात निर्घृण हत्या

(young boy acted with Amitabh Bachhan has been arrested in crime of mobile theft)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.