शालेय फीचा प्रश्न पेटला, ऐरोलीत पालक शाळेविरोधात रस्त्यावर; सानपाड्यात पालकांना वकिलांकडून नोटिसा

| Updated on: Jun 30, 2021 | 1:55 PM

कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा गेल्या वर्षापासून बंद आहेत. गेल्या वर्षभरात पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात शाळा फी वरुन वाद झाल्याच्या घटना घडत आहेत. (School Fee Issue)

शालेय फीचा प्रश्न पेटला, ऐरोलीत पालक शाळेविरोधात रस्त्यावर; सानपाड्यात पालकांना वकिलांकडून नोटिसा
नवी मुंबईत पालकांचं आंदोलन
Follow us on

नवी मुंबई: कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा गेल्या वर्षापासून बंद आहेत. गेल्या वर्षभरात पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात शाळा फी वरुन वाद झाल्याच्या घटना घडत आहेत. शाळा फीच्या मुद्यावरुन नवी मुंबईत शाळेच्या मनमानी विरोधात पालक आक्रमक झाले आहेत. ऐरोली सेक्टर १९ एन एच पी स्कुल मधील पालक रस्त्यावर आंदोलनाला बसले आहेत. शाळेच्या फी शुक्ल वसुली विरोधात पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शाळेने फी भरली नाही म्हणून मुलांना ऑनलाईन क्लास मधून बाहेर काढले आहे. सानपाड्याच्या रेयान स्कूल ने वकिलांमर्फत नोटीस पाठवली आहे. वकिलांनी नोटीस बजावल्याने पालक चिंतेत आले आहेत. (Navi Mumbai Parents are angry and starting Protest at Airoli)

नेमंक प्रकरण काय?

ऐरोली येथील एन.एच.पी शाळेच्या पालकांनी रस्त्यात ठिय्या मांडला आहे.शाळा व्यवस्थापन फी वसुलीसाठी तगादा लावत असल्याने पालकांनी थेट रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे . शाळेकडून फी वसुलीसाठी तगादा लावल्याने हे आंदोलन केले जात असून महिलांसह पालक रस्त्यावर उतरले आहेत.

रेयॉन शाळेकडून पालकांना नोटीस

सानपाडा येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलने तर वकीलांमार्फत पालकांना फी भरण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

राज्य शासनाचा आदेश डावलून फी वसुलीचा तगादा

पालकांवर फी घेण्याची सक्ती करू नये असे राज्य शासनाकडून सांगण्यात आलं आहे. बहुतांशी शाळा फी साठी पालकांच्या मागे तगादा लावत आहेत, यासाठी मुलांना ऑन लाईन वर्गातून बाहेर काढले जात आहे.

सानपाडा येथील रेयॉन इंटरनॅशनल शाळेच्या कारभारामुळे पालक वर्गात संतापाचे वातावरण आहे. कोविड काळात नोकरी गेलेल्या पालकांना मुलांची शाळेची फी भरणे अशक्य आहे. त्यात शाळा केवळ ट्युशन फी न घेता सरसकट फी घेत असल्याने पालकांना ही फी भरणे कठीण झालं आहे. रेयॉन इंटरनॅशनल या शाळेने तर चक्क पालकांना वकीलांकडून कायदेशीर नोटीस पाठवली आहे , यामुळे पालक चिंतेत आहेत. काहींना पोस्टाने तर काहींना ऑनलाईन नोटीस पाठवली असून, सात दिवसात फी न भरल्यास शाळा सोडल्याचा दाखला दिला जाईल, असा इशादा देत आहेत. तसेच मुलांना ऑनलाईन वर्गात न घेणे हा प्रकार शाळेकडून केला जात असल्याच्या घटना घडत आहेत.

पालकांकडून कृती समिती स्थापन

पालकांनी नवी मुंबई पालक संघर्ष कृती समिती या संस्थेची स्थापना केली आहे.तांत्रिक व कायदेशीर मुद्द्यावर शालेय शिक्षण संस्थांशी लढा देण्याचं काम केलं जात आहे. या समितीनं शुल्क वसुलीच्या मुद्द्यावर लढा सुरू केला आहे. या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट शिष्टमंडळाने घेतली होती. समिती आता शालेय क्रीडा विभागाचे कायदे आणि अध्यादेश आदी मुद्द्यांवर सखोल अभ्यास करून लढा देत आहे.

संबंधित बातम्या:

लोकांना जराही धीर नाही, कोरोनाकाळात राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी विचार करायला हवा- हायकोर्ट

APMC मार्केटमध्ये मास्क विरोधातील कारवाई दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, गुन्हा दाखल

(Navi Mumbai Parents are angry and starting Protest at Airoli)