लोकांना जराही धीर नाही, कोरोनाकाळात राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी विचार करायला हवा- हायकोर्ट

Navi Mumbai Airport | नवी मुंबईच्या आंदोलनात 25 हजारांच्या आसपास लोकांची गर्दी झाली होती. या मुद्याचं राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी परिस्थितीचा थोडा विचार करायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले.

लोकांना जराही धीर नाही, कोरोनाकाळात राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी विचार करायला हवा- हायकोर्ट
नवी मुंबई विमानतळ

मुंबई: नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन करण्यात आलेल्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. कोरोनाच्या काळात लोक आंदोलन (Navi Mumbai protest) करतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. विमानतळ अजून तयार झाले आहे का? लोकांना जराही धीर नाही, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले. (Navi Mumbai airport naming controversy)

नवी मुंबईच्या आंदोलनात 25 हजारांच्या आसपास लोकांची गर्दी झाली होती. या मुद्याचं राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी परिस्थितीचा थोडा विचार करायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले.

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. त्यासाठी 24 जूनला प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी सिडकोला घेराव घातला होता. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तब्बल 5 हजार पोलीस कर्मचारी याठिकाणी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे नवी मुंबईला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर ठाम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Navi Mumbai International Airport) ज्या शेतकऱ्यांच्या भूमीचे संपादन झाले आहे त्यांच्या माध्यमातून जन आंदोलन करण्यात आले आहे. स्वर्गीय दि. बा. पाटील यांनी केलेल्या जन आंदोलनामुळे साडे 12 टक्के भूखंड वाटप ही संकल्पना उदयाला आली होती. त्याचाच भाग असणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्या 18 गावांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्या गावातील ग्रामस्थांनी विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून जन आंदोलन छेडले आहे. मात्र, राज्य सरकारने या विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या :

बाळासाहेब की दि. बा. पाटील?, राज्य सरकारचं ठरलं, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबद्दल मोठा निर्णय!

VIDEO | रायगडचे आगरी खूप डेंजर, घरात कोयते ठेवतात, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर गुन्हा

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, त्यांना स्थानिकांबद्दल अजिबात आस्था नाही : भाजप

नवी मुंबई विमानतळ आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकरवर सूड उगवला जातोय का? दरेकरांचा सवाल

(Navi Mumbai airport naming controversy)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI