नवी मुंबई विमानतळ आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकरवर सूड उगवला जातोय का? दरेकरांचा सवाल

नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकर यांच्यावर सूड उगवला जात नाही ना? असा सवाल दरेकर यांनी केलाय.

नवी मुंबई विमानतळ आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकरवर सूड उगवला जातोय का? दरेकरांचा सवाल
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अभिनेता मयुरेश कोटकर
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 3:05 PM

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्या प्रकरणी मराठी अभिनेता मयुरेश कोटकरला अटक करण्यात आलीय. ठाण्यातील श्रीनगर पोलिसांकडून मयुरेश कोटकरला अटक करण्यात आली आहे. कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या अटक प्रकरणात भाजपचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारलाय. नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकर यांच्यावर सूड उगवला जात नाही ना? असा सवाल दरेकर यांनी केलाय. (Praveen Darekar criticizes Eknath Shinde in actor Mayuresh Kotkar arrest case)

‘लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल पिटत असताना कोटकर नावाच्या व्यक्तीला अशाप्रकारे अटक करणं निंदनीय आहे. कोटकर हा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं ही मागणी करणाऱ्या आंदोलनात सहभागी होता. फेसबूकच्या माध्यमातून अनेकजण बोलत असतात, व्यक्त होत असतात. पण केवळ आपल्याबद्दल बोललं म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करा, अटक करा हे चूक आहे. ठाण्यातील कुरमुसे प्रकरण, काल परवा दिलीप लांडेंनी कंत्राटदारावर कचरा टाकण्याचं प्रकरण आणि आता हे प्रकरण. या सगळ्याचा मी निषेध करतो,’ अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

शिवसेना कार्यकर्त्यांची पोलिसात तक्रार

शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

बाळासाहेब की दि. बा. पाटील?, राज्य सरकारचं ठरलं, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबद्दल मोठा निर्णय!

VIDEO | रायगडचे आगरी खूप डेंजर, घरात कोयते ठेवतात, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर गुन्हा

Praveen Darekar criticizes Eknath Shinde in actor Mayuresh Kotkar arrest case

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.