AC डब्यात नको ते करायचा अन् रेल्वे स्थानकात उतरताच…पनवेल स्थानकात समोर आलं कांड

एक व्यक्ती रेल्वेच्या AC डब्यात इतर प्रवाशांप्रमाणे घुसयचा. त्यानंतर संधी साधून नको ते कृत्य करायता. त्यानंतर जे रेल्वे स्थानक येत असे तेथे उतरत असे आणि विमानतळावर पोहोचत असे. विमानाने दुसऱ्या राज्यात जात असे. पनवेल रेल्वे स्थानकात या व्यक्तीचा प्रताप समोर आला आहे.

AC डब्यात नको ते करायचा अन् रेल्वे स्थानकात उतरताच...पनवेल स्थानकात समोर आलं कांड
Panvel
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 12:40 PM

पनवेल रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे पोलिसांनी एका अशा व्यक्तीला अटक केली आहे जो एसी कोचमधील लोकांना टार्गेट करत असे. तो एसी कोचमध्ये चढायचा, भयानक कृत्य करायचा आणि पुढच्या रेल्वे स्थानकात उतरुन थेट विमानतळावर जायचा. विमानाने दुसऱ्या राज्यात जात असे. पण पनवेल रेल्वे स्थानकात पोलिसांना या व्यक्तीवर संशय आला. त्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली. जे काही उघड झाले त्याने अनेकांना धक्का बसला.

नेमकं काय घडलं?

अटक झालेल्या आरोपीची ओळख उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील ४१ वर्षीय रघु सुमन खोसला अशी झाली आहे. त्याला नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्थानकावर नियमित सीसीटीव्ही निगराणी आणि अँटी-सबोटेज तपासणीदरम्यान ताब्यात घेण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या मते, १७ जुलैला आरोपी मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसच्या AC कोचमधून उतरल्यानंतर संशयास्पद पद्धतीने फिरताना दिसला. त्याच्या हालचालींवर संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला थांबवून बॅगची तपासणी केली, ज्यात मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीचे दागिने सापडले.

बॅगच्या तपासणीत उघडकीस आले रहस्य

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की जेव्हा आरोपीला जप्त केलेल्या दागिन्यांबद्दल विचारणा केली तेव्हा तो कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर त्याला तातडीने ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली. तपासात समोर आले की जप्त केलेले दागिने १७ जुलैला नेत्रावती एक्सप्रेसमध्ये झालेल्या चोरीशी संबंधित आहेत. या घटनेत केरळला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाची हॅंडबॅग चोरीला गेली होती, ज्यात सोने-चांदीचे दागिने तसेच एक आयफोनही होता. ही चोरी कर्नाटकातील कारवार स्थानकाजवळ झाली होती. या प्रकरणात गोव्यातील मडगाव येथील कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आता जप्त केलेले सामान त्याच प्रकरणाशी जोडून पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

39 गुन्हे दाखल

रेल्वे पोलिसांच्या तपासात असेही समोर आले की रघु सुमन खोसला हा शातिर गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई रेल्वे नेटवर्कशिवाय देशातील विविध राज्यांमध्ये चोरी आणि इतर गुन्ह्यांचे एकूण ३९ प्रकरणे दाखल आहेत. पोलिसांच्या मते, आरोपी विशेषतः एक्सप्रेस ट्रेन्सच्या AC कोचमध्ये प्रवास करत असे आणि संधी मिळताच प्रवाशांचे बॅग घेऊन पळून जात असे. दीर्घकाळापासून त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली होती. ट्रेनमधून उतरल्यानंतर तो थेट विमानतळ गाठत असे. विमानाने दुसऱ्या राज्यात प्रवास करत असे.

रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS)च्या कलम ३०५ (c) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम निवास किंवा वाहतुकीदरम्यान चोरीशी संबंधित गुन्ह्यांना लागू होतात.
अटकेनंतर आरोपीची कस्टडी आणि जप्त केलेले सर्व सोने-चांदीचे दागिने पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी गोव्यातील मडगाव येथील कोकण रेल्वे पोलिस ठाण्याला सुपूर्द करण्यात आले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us