अनलॉकनंतर मोठ्या प्रमाणात घरफोड्या, नवी मुंबईत सराईत चोरांची टोळी गजाआड

| Updated on: Jul 10, 2021 | 5:34 PM

नवी मुंबईसह मुंबई व ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या नवी मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

अनलॉकनंतर मोठ्या प्रमाणात घरफोड्या, नवी मुंबईत सराईत चोरांची टोळी गजाआड
Follow us on

नवी मुंबईत : नवी मुंबईसह मुंबई व ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या नवी मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये महरुफ शेख (23) युसूफ शेख (25) यांना नेरुळ पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. हे आरोपी सराईतपणे चोरी करत असल्याने पोलिसांना त्यांचा सुगावा लागत नव्हता. मात्र गुप्त बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तसेच त्यांच्याकडून एकूण 6 लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Robberies increased in Navi Mumbai, Nerul police caught gang of thieves)

ठाणे, मुंबईसह, नवी मुंबईत महारुफ शेख याच्यावर 9 तर युसुफ शेख याच्यावर 14 असे एकूण 23 गुन्हे दाखल आहेत. या आरोपींबाबत अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत. नवी मुंबई परिसरातील कोपरखैरणे, सीबीडी बेलापूर, ठाणे येथील कळवा, महात्मा फुले चौक तसेच खडकपाडा तर मुंबई येथील भायखळा येथे या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल होते. नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त भरत गाडे आणि नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांनी तयार केलेल्या पथकाने या चोरांना पकडण्याची कामगिरी पार पाडली. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मोरे व राजेंद्र घेवडेकर यांनी तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून ठाणे येथील कळवा परिसरातून गुन्हेगारांना अटक केली.

अनलॉक प्रक्रियेनंतर परिमंडळ 1 परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढल्या होत्या. यात नेरुळ पोलीस ठाण्याअंतर्गत तयार केलेल्या पथकाने या दोन आरोपीना अटक केली आहे. चौकशीत त्यांनी चार घरफोड्यांची कबुली दिली आहे. 147 ग्राम सोने आणि चांदीचे दागिने असे एकूण 6 लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक ठिकाणी विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इतर बातम्या

9 दुचाकी आणि 3 आरोपी, कोपरखैरणे पोलिसांची धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

कोरोना लस घेण्याआधी अँटीजेन किंवा RTPCR चाचणी बंधनकारक, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच लसीकरण, पनवेल महापालिकेचे आदेश

(Robberies increased in Navi Mumbai, Nerul police caught gang of thieves)