कोरोना लस घेण्याआधी अँटीजेन किंवा RTPCR चाचणी बंधनकारक, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच लसीकरण, पनवेल महापालिकेचे आदेश

यामुळे आता पनवेल महापालिकेत खासगी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जाणाऱ्यांना कोव्हिड चाचणी बंधनकारक असणार आहे.

कोरोना लस घेण्याआधी अँटीजेन किंवा RTPCR चाचणी बंधनकारक, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच लसीकरण, पनवेल महापालिकेचे आदेश
पनवेल महापालिका मुख्यालय

पनवेल : कोरोना लस घेण्याआधी अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे, असे आदेश पनवेल मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी दिले आहे. त्यामुळे आता पनवेलमधील नागरिकांना कोव्हिड रिपोर्ट निगेटिव्ह असल्यानंतरच लस मिळणार आहे. (Panvel Municipal Corporation Order mandatory to test for antigen or RTPCR before taking corona vaccine)

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

पनवेल महानगरपालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही खासगी कोव्हिड लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची अँटीजेन व कोव्हिड RTPCR चाचणी करुन ती निगेटिव्ह असल्यास लसीकरण करावे. तर पॉझिटिव्ह आल्यास त्याला पुढील तपासणीसाठी पाठवावे. याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व खासगी लसीकरण केंद्र आणि वर्कप्लेस CVC ला हे पत्र जारी करुन आदेश देण्यात आले आहेत.

कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच लसीकरण

यामुळे आता पनवेल महापालिकेत खासगी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जाणाऱ्यांना कोव्हिड चाचणी बंधनकारक असणार आहे. जर या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच तुम्हाला लस दिली जाणार आहे.

नागरिकांकडून नाराजी 

दरम्यान पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या या आदेशावर अनेक नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे. कोरोना लसीकरणासाठी कोविड चाचणीचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

(Panvel Municipal Corporation Order mandatory to test for antigen or RTPCR before taking corona vaccine)

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत लसीकरणाला गती, तृतीयपंथियांसाठी विशेष लसीकरण सत्र

केंद्र सरकारने लागू केलेला डाळीवरील कायदा रद्द करा, नवी मुंबईतील APMC मार्केटमधील मसाला आणि धान्य व्यापारांकडून बंदची हाक

कोरोनामुळे 35 वर्षांपासून सुरू असलेला बँड बंद, पोटासाठी नवी मुंबईच्या रस्त्यावर ट्रंपेट वादन 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI