मुंबई एपीएमसी परिसरात कारमध्ये अचानक स्पार्क, काही सेकंदात जळून खाक

नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ही कार मात्र पूर्ण जळून खाक झाली आहे.

मुंबई एपीएमसी परिसरात कारमध्ये अचानक स्पार्क, काही सेकंदात जळून खाक
Navi Mumbai APMC
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 11:18 AM

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ही कार मात्र पूर्ण जळून खाक झाली आहे (Sudden spark in a car in Mumbai APMC area car burns).

मुंबई एपीएमसी परिसरात एका कारला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. तुर्भे स्टेशन भागातून माथाडी भवनाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली.

Navi Mumbai APMC Car Burns

एपीएमसी परिसरात टाटा इंडिका या धावत्या कारमध्ये अचानक स्पार्क झाला. यानंतर त्या गाडीत अचानक आगीचा भडका उडाला. यावेळी आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, पेट घेतलेल्या कारमध्ये अक्षरश: स्फोट होत होते.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर वाशी अग्निशमन दलातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही कार पूर्णत: जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे तुर्भे ते माथाडी भवन रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Sudden spark in a car in Mumbai APMC area car burns

संबंधित बातम्या :

माझ्या वाढदिवसाचे बॅनर्स लावू नका, ते पैसे पूरग्रस्त-कोरोना पीडितांना द्या : संदीप नाईक

पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांची बदली, पाच वर्षांचा काळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची ट्रान्सफर