AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या वाढदिवसाचे बॅनर्स लावू नका, ते पैसे पूरग्रस्त-कोरोना पीडितांना द्या : संदीप नाईक

ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक हात मदतीचा' उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील विविध विभागातून आज पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक सामग्री वाहनांमधून रवाना करण्यात आली. नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि गणेश नाईक चारीटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली आहे.

माझ्या वाढदिवसाचे बॅनर्स लावू नका, ते पैसे पूरग्रस्त-कोरोना पीडितांना द्या : संदीप नाईक
sandeep-naik
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 7:07 AM
Share

नवी मुंबई : ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील विविध विभागातून आज पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक सामग्री वाहनांमधून रवाना करण्यात आली. नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि गणेश नाईक चारीटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली आहे (Navi Mumbai MLA Sandeep Naik’s birthday expenses gave to help flood victims).

लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मदतीची वाहन कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांमध्ये रवाना झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि राज्यातील पूरग्रस्त परिस्थिती पाहता समाजाप्रती संवेदनशीलता दाखवत संदीप नाईक यांनी यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणीही बॅनर आणि होर्डिंग लावू नये आणि वाढदिवस साजरा करु नये त्याऐवजी कोरोना पीडितांना आणि पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन केले होते. त्यानुसार नवी मुंबईतून मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. खास करुन संदीप नाईक यांना माणणारा युवा वर्ग मोठ्या संख्येने पुढे आला.

दिघा, ऐरोली, दिवा गाव, रबाळे, खैरणे बोनकोडे, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सीवूड, करावे, सानपाडा, तुर्भे या भागातील कार्यकर्ते ही मदत घेऊन स्वतः पूरग्रस्त भागांमध्ये ती पोहोचवणार आहेत. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी सभापती आनंत सुतार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.

उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना लोकनेते आमदार गणेश नाईक म्हणाले, “संकटग्रस्तांना मदत करण्याची नवी मुंबईतील कार्यकर्त्यांची भावना नेहमीच दिसून येते. विशेषतः संदीप नाईक यांच्या आवाहनानुसार नवी मुंबईतील युथ ब्रिगेडचा कर्तव्यभावनेने पूरग्रस्त मदत कार्यातील सहभाग कौतुकास्पद आहे.”

Navi Mumbai MLA Sandeep Naik’s birthday expenses gave to help flood victims

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे आगळा वेगळा फ्रेंडशिप डे; पुढील मैत्रीदिनापर्यंत 5 मित्र 25,000 झाडं लावणार

राज्यावर विविध संकटांचा डोंगर, मात्र पणनमंत्र्यांचा गर्दी करत रस्त्यावरच वाढदिवस

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.